बालकिसनजी बजाज यांचं वृध्दापकाळने 84 व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक आणि थोर महात्मा बालकिसनजी नागनाथ बाजाज यांचं आज (सोमवार) पुण्यात वृध्दापकाळने निधन झाले. ते 84 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड आहेत. बालकिसनजी यांनी आपल्या निस्वार्थ आणि धार्मिक कार्यातून संपुर्ण पुण्यासह इतर गावांमध्ये देखील सर्व माहेश्वरी समाजावर सदैव आपले व्यक्तिमत्व रेखाटले होते. त्यांच्या निधनामुळं बजाज कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

बालकिसनजी बजाज यांच्याबाबत थोडक्यात

सदैव हसत मुख असलेला चेहरा!डोक्यावर काळी टोपी, कपाळावर तिलक ,धोतर अशी वेषभूषा असलेले एक महान व्यक्तिमत्व !

ज्याने आपल्या निस्वार्थ, धार्मिक कार्यातून सर्व पुण्या सोबत अन्य गांवामध्ये सर्व माहेश्वरी समाजावर सदैव आपले व्यक्तिमत्व रेखाटले असे थोर महात्मा स्व. श्री. बालकिसनजी बजाज हे आपणा सर्वाना सोडून आज ईश्वर चरणी विलिन झाले.

कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो, मग ती रामायण असो , सुंदर कांड चे पाठ असो, नानी बाई चा मायरो असो, भागवत सप्ताह असो, यज्ञ सोहळा असो, आयोजकांना बालकिसनजीच्या सल्ल्यामशवर्‍या शिवाय कोणताही पर्याय नसे ! बालकिसनजी त्या ठिकाणी आपल्या नेहमी बरोबर असणार्‍या व्यक्तीसह नसतील तर नवलच ?

पुणे व महाराष्ट्रातील अन्य गावा गावा मध्ये सोलापूर , परळी वैजनाथ मराठवाड्यातील काही भाग तिरुपती बालाजी येथे ब्रम्होत्सवा मध्ये जाऊन तेथे सर्वाना धर्नुमांस उत्सवा मध्ये प्रभात फेरी चे आयोजन करुन प्रभात फेरी चे महत्व सांगणारे , स्वत: पहाटे तीन वाजता उठून प्रभात फेरी करिता सर्वाना फोन करुन आमंत्रित करणारे , सकाळी स्वत: सर्व मंदिरा मधील प्रभात फेरीतील भाविकांना आवर्जून बदाम कतली पोहचविणारे हे साधे व्यक्तिमत्व !

पंढरपूर वारीतील वारकर्‍यांना स्वत: पंढरपूर ला आपल्या सर्व लवाजम्या सह जाऊन अन्न सेवा देणारे व्यक्तिमत्व!

ज्या गायी दूधदुभते देत नाही अशा गायी करिता चारा , खाद्य करिता सर्व दानदात्या कडून राशी गोळा करुन , सामुग्री गोळा करणारे हे व्यक्तिमत्व!
लोटे चिपळूण (कोकण ) येथील अशा ज्या गायी पिढीत आहेत,समाजातील थोर दानदांत्याकडून राशी गोळा करुन ज्या गांयी पासून कोणतेही उत्पन्न नाही, अशा सर्व गायीच्या गो शाळे करिता १५-२० शेड बांधून देणे, पाण्या करीता नुकतीच त्यांनी विहिरी चे निर्माण करुन दिले, लाॅक डावून मध्ये सर्व चारा आगीमध्ये नष्ट झाला, अशावेळी देखिल दानदात्या कडून दानराशी गोळा करुन त्या ठिकाणी चारा पोहचविण्यात आला.

ह्या सर्व पिढीत गायी दत्तक घेवून त्यांची अविरत सेवा करणारे हे साघे व्यक्तिमत्व!

मराठवाडा असो , राजस्थान असो दुष्काळ काळा मध्ये हे स्वत: सर्व दानदात्या कडे पोचून गाई करिता चार्‍या करिता दानदांत्या कडून राशी गोळा करुन ,गाड्या गाड्या भरुन त्या ठिकाणी चारा पाठविणारे हे साध व्यक्तिमत्व !

पोटात कोणतही कपट नाही , राजकारण नाही, प्रसिध्दीचा हव्यास नसलेला , स्टेज , सत्कारा पासून लांब असलेल्या अशा स्व. श्री . बालकिसनजी बजाज यांना पुणे जिल्हा सभे च्या वतीने खूप विनवणी नंतर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अशा थोर व्यक्तिमत्वांस माहेश्वरी समाजाचा धर्मात्मा म्हणून उपाधी देखिल बहाल करण्यात आली होती.

आज रोजी बालकिसनजी बजाज हे ईश्वर चरणी विलिन झाले , हा सर्व पुणेकर माहेश्वरी समाज व महाराष्ट्रातील अनेक माहेश्वरी समाजाकरीता मोठा आघात झाल्याचे संजय चांडक यांनी सांगितले.