Balkrishna Industries Ltd | 1 रुपयावरून 2100 च्या पुढे गेला टायर कंपनीचा शेअर, 1 लाखाचे झाले 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Balkrishna Industries Ltd | गेल्या काही वर्षांत एका कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 200000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. या कंपनीचे नाव बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (Balkrishna Industries Ltd) आहे. ही कंपनी टायर बनवते. बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 1 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

 

कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2724.40 रुपये आहे. त्याच वेळी, बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअरची 52 आठवड्यांची लो लेव्हल 1681.95 रुपये आहे.

 

1 लाख रुपयांचे झाले 21 कोटींहून जास्त

7 जून 2002 रोजी बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1 रुपयाच्या पातळीवर होता. कंपनीचा शेअर 24 जून 2022 रोजी बीएसईवर 2131 रुपयांवर बंद झाला.

बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअरनी या कालावधीत गुंतवणूकदारांना 200000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 7 जून 2002 रोजी बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आता ही रक्कम 21.31 कोटी रुपये झाली असती. (Balkrishna Industries Ltd)

 

10 वर्षात पैशात झाली 17 पटीने वाढ

29 जून 2012 रोजी बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर 124.49 रुपयांच्या पातळीवर होता.
कंपनीचा शेअर 24 जून 2022 रोजी बीएसईवर 2131 रुपयांवर बंद झाला.

जर एखाद्या व्यक्तीने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल तर आता हे पैसे 17.11 लाख रुपये झाले असते.

मागील 5 वर्षात बाळकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअरनी जवळपास 157 टक्के रिटर्न दिला आहे.
त्याचवेळी, या वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर सुमारे 9 टक्क्यांनी घसरला आहे.

 

Web Title :- Balkrishna Industries Ltd | balkrishna industries turned 1 lakh rupee into more than 21 crore rupee

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा