टोरोंटोमध्ये बलुच कार्यकर्तीचा आढळला मृतदेह

टोरोंटो : पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील लोकप्रिय व्यक्तीमत्व व महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या करिमा बलुच यांचा मृतदेह टोरोंटोमध्ये आढळून आला आहे. गेल्या रविवारी त्या आपल्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कर आणि सरकारी अत्याचारांबद्दल त्यात सातत्याने आवाज उठवत होत्या. करीमा एक कॅनेडियन निर्वासित होती. बीबीसीने २०१६ मध्ये जगातील पहिल्या १०० सर्वात प्रेरणादायक आणि प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला होता.

टोरोंटोमधील घरातून त्यात रविवारी बेपत्ता झाल्या होत्या. टोरोंटो पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी मोठी मोहिम राबविली होती. सर्व लोकांना आवाहनही केले होते. एका ठिकाणी आज त्यांचा मृतदेह आढळून आला. बलुचिस्तानमधील प्रसिद्ध व्यक्तीमत्व करीमा बलोच या तेथील महिलांच्या प्रणेता असल्याचे मानले जाते. स्वित्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनातही त्यांनी बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. २०१७ मध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला बुलचिस्तानमधील महिलांना वाचवावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.

पाकिस्तान विरोधात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा मृत्यु होण्याचे हे पहिले प्रकरण नाही. यापूर्वी मे महिन्यात बलुच पत्रकार साजित हुसेन हे स्वीडनमध्ये मृतावस्थेत आढळले होते. तो २ मार्चपासून उप्सला शहरातून बेपत्ता होता.