अमेरिकेचा दणका ! पाकिस्तानातील ‘या’ संघटनेला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील बलूचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजेच (बीएलए) या संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हि संघटना मागील अनेक वर्ष पाकिस्तानमधून वेगळे होत स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचे पाकिस्तानने स्वागत केले असून या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होईल असे म्हटले आहे.

या दहशहतवादी संघटनेवर पाकिस्तानने २००६ मध्ये बंदी घातली होती. त्यानंतर या संघटनेवर अनेक दहशतवादी कारवाया केल्याचे आरोप करण्यात आले होते. अमेरिकेच्या या कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अमेरिकेने बंदी घातल्यानंतर आता या संघटनेशी संबंधित सर्व लोकं, याचे पुरस्कर्ते, या संघटनेसाठी निधी गोळा करणारे तसेच या संघटनेचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या सर्वांना गुन्हेगार ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुणीही गुन्ह्यांमध्ये सापडल्यास त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल. या संघटनेवर पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच अमेरिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. पाकिस्तान देखील मागील अनेक वर्षांपासून या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी करत होता.

दरम्यान, अमेरिकेच्या सरंक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे कि, बलूचिस्तान लिबरेशन आर्मी हि पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करत होते. यामध्ये सुरक्षा दल आणि निर्दोष नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. त्यामुळे आता यापुढे या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले असून या संघटनेशी संबंधित सर्व संपत्ती लवकरच जप्त करण्यात येणार आहे.

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

झोप येत नाही ? मग करा हा प्रयोग, शांत झोप येईल

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक