‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर तातडीनं बंदी घाला : खा. छत्रपती संभाजीराजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे भाजपानं प्रकाशित केलेलं पुस्तक चांगलच वादात सापडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी देखील होऊ शकत नाही असे सांगत खा. छत्रपती संभाजीराजे यांनी पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची भुमिका घेतली आहे. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी देखील या पुस्तकावरून भाजपाला लक्ष्य केलं आहे.

कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. भाजपाच्या कार्यालयात पुस्तक प्रकाशित झालं तिथं महाराष्ट्राचेही एक खासदार उपस्थित होते. या पुस्तकावर राष्ट्रीय अध्यक्षांनी तात्काळ बंदी आणली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊच शकत नाही. माझा जन्म महाराजांच्या घरात झाल्याने मला बोलण्याचा अधिकार आहे अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त पुस्तकावरून भाजपला टोला लगावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/