नेत्यांची शिवरायांशी ‘तुलना’ होणाऱ्या सर्व पुस्तकांवर ‘बंदी’ आणा, भाजप नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना ‘पत्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन सुरु झालेले रणकंदन संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की अशा सर्व पुस्तकांवर राज्यात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अशी जेवढी पुस्तके असतील ज्यात एखाद्या नेत्याची तुलना शिवरायांशी केलेली असेल, त्या सर्व पुस्तकांवर बंदी घालण्याची अवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाची बरोबरी होऊ शकत नाही. अशा सर्व पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी मी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

यावर पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना की ते पुस्तक लिहिले होते आणि ना लिहायला सांगितले होते. मी शिवाजी महाराज्याच्या बरोबरीचा आहे असेही ते म्हणाले नाहीत. परंतु त्या पुस्तकाच्या आडून पंतप्रधान मोदींवर जी टीका करण्यात आली, जे राजकारण करण्यात आले ते निंदनीय आहे.

या बरोबर वाद सुरु आहे तो जाणता राजा या शब्दावरुन. याचे पडसाद आज साताऱ्याच्या सभेत उमटले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की रामदास स्वामी यांनी जाणता राजा हा शब्द जन्माला घातला होता. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते, शिवरायांच्या गुरु या माँ जिजामाता होत्या. यावेळी शरद पवार हे साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/