आव्हाळवाडी रोड व वाघेश्वर मंदिरचौकात फळे व भाजीपाला विक्री करण्यास मनाई

वाघोली : वाघोली(ता:हवेली) येथिल आव्हाळवाडी रोड व वाघेश्वर मंदिर चौक येथे फळे व भाजीपाला विक्री करण्यास वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने फलक लाऊन भाजीपाला विक्रीला मनाई करण्यास सुरुवात झाली आहे.

आव्हाळवाडी रोड येथे पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत शेतमाल, भाजीपाला व फळे विक्री करणारे शेतकरी, व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी होत होती. कोरोनाच्या परीस्थितिमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. वाघेश्वर मंदिरचौकामध्ये देखील अशाचप्रकारे गर्दी होत आहे. वाघोलीतील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आटोक्यात आला असला तरी कोरोना विषाणुचा उद्रेक वाढु नये यासाठी आव्हाळवाडी रोड व वाघेश्वर मंदिर चौक या ठिकाणी फळे व भाजीपाला गाडी मधुन किंवा या ठिकाणी बसुन विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. बाहेर गावातुन फळे व भाजीपाला गाडी थांबवुन विक्री करण्यास देखील मनाई आहे. विनापरवाना व बेकायदेशिरपणे फळे, भाजीपाला विक्री केल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल असा फलक वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांच्या वतीने लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पोलिसांनी गर्दीमध्ये भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

ज्या ठिकाणी भाजीपाला व फळे विक्रीसाठी बंदी केली आहे त्या ठिकाणी भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर ग्रामपंचायत व पोलिसाकडून संयुक्तपणे कारवाई केली जाईल

प्रताप मानकर ,(वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद)