आता भारताशेजारील ‘या’ देशातही होणार नोटबंदी 

काठमांडू : वृत्तसंस्था – भारताच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळने ही नोटबंदी चा निर्णय घेतला आहे. १०० रुपयांहून अधिक किमतीच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळच्या मंत्रीमंडळाने घेतला असून यावर लवकरच अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत.नेपाळच्या एका वृत्तपत्रानुसार नेपाळ सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे ,की १०० पेक्षा अधिक मूल्याचे म्हणजेच २००,५००,२००० रुपयांच्या नोटा बाळगू नका.
भारतीय चलन हे नेपाळमध्येही वापरलं जातं त्यामुळे भारतात जेव्हा नोटाबंदी चा निर्णय झाला त्यावेळी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या जुन्या नोटा अडकून पडल्या होत्या. त्या नोटांचा नेपाळ सरकारला काहीही उपयोग करता आला नाही. या समस्येमुळेच नेपाळनं भारतातून येणाऱ्या २००,५०० आणि २००० रुपयांच्या नविन नोटांवरच बंदी घातली आहे. .
नोटाबंदीमुळे नेपाळमधल्या अनेक बँकांमध्ये करोडोच्या नोटा तशाच पडून होत्या. ज्या परत चलनात आल्याच नाहीत. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ला भारत सरकारनं नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. ज्यात ५००आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती.