HM अमित शहांवर ‘निर्बंध’ घाला, अमेरिकन आयोगाची मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत नागरिक सुधारणा विधेयक 2019 सादर केले. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला अखेर बहुमताने हे बिल पारित करण्यात आले. त्यानंतर आता याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे अमित शहांवर बंदी घाला, अशी मागणी अमेरिकन आयोगाकडून करण्यात आलेली आहे.

हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे असे अमेरिकन आयोगाने म्हटले आहे म्हणूनच अमेरिकेकडून अमित शहा यांच्यावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायद मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल.

कॅब संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेत्यांवर निर्बंध लावण्याचा विचार करावा असे अमेरिकेच्या यूएससीआयआरएफ आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे पडसाद थेट आंतरराष्ट्रीय राजकारणात उमटायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like