ठराविक वेळेत खासगी बस, ट्रॅव्हल्स, जड व अजवड वाहनांवर बंदी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक विभागाने  विविध ठिकाणी ठराविक वेळेत खासगी बस, ट्रॅव्हल्स, जड व अजवड वाहनांवर बंदी घातली आहे.  हे बदल असणार आहेत. हे बदल चाकण, भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, सांगवी विभागात केले आहेत. अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आली आहे. हे सर्व बदल प्रायोगिक तत्वावर (२४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर) सुरू करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने केलेल्या बदलांबाबत नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असतील तर त्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे लेखी स्वरूपात जमा करण्याचे आवाहन, वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

चाकण, भोसरी, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, सांगवी वाहतूक विभागात करण्यात आलेले बदल

# वाकी (चाकण) ते वाकड गाव चौक दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद

# जुना मुंबई-पुणे रस्त्यावरील सेंट्रल चौक (देहूरोड) ते हॅरीस ब्रिज दापोडी पर्यंत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद

# भूमकर चौक ते महावीर चौक दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊवाजेपर्यंत प्रवेश बंद

बँक खातं, सिम कनेक्शनसाठी आधार अनिवार्य नाही : सुप्रीम कोर्ट

# देहूगाव ते आळंदी दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद

# मानकर चौक ते आळंदी रोड दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद

# तळेगाव ते चाकण दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद. तसेच दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना पार्किंग व हॉल्टिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

# औंध ब्रिज ते वाकड ब्रिज दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद

# पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांवर खाजगी लक्झरी बसेस, कंपनी बसेस व जड वाहतुकीस सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद

# भोसरी चौकातून दिघी मॅगझीन चौकाकडे व दिघी मॅगझीन चौकाकडून भोसरी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांस सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद

# भोसरी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड अंतर्गत दापोडी चौक ते आंबेडकर चौक (दापोडी गाव) पर्यंत सांगवी, पिंपळे गुरव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाणे-येणे साठी सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद

# म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल आणि म्हाळसाकांत चौक ते खंडोबा माळ चौक व बजाज ऑटो चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस जड वाहनांना प्रवेश बंद

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a59c56d-c158-11e8-9097-d378ef991666′][amazon_link

# एमआयडीसी जी ब्लॉक मधील शाहूनगर गार्डन जवळील सहजीवन सोसायटीस लागून असलेल्या अंतर्गत रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना कायमस्वरूपी प्रवेश बंद

# खंडोबा माळ चौक ते चापेकर चौक दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना कायमस्वरूपी प्रवेश बंद

# कुणाल हॉटेल चौक ते नखाते वस्ती चौक या रस्त्यावर अवजड वाहनांना सकाळी नऊ ते बारा आणि सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत प्रवेश बंद

# भोसरी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड अंतर्गत पुणे मुंबई महामार्गावरील फुगेवाडी ते नाशिक फाटा दरम्यान कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग मार्गाकडे जाणा-या रोडवर सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद

asins=’B00M3U924A,B008XYB0T0,B01N4G7OFS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57181935-c158-11e8-bf0f-b35fff73f414′]

# पुणे-मुंबई महामार्गावरील कासारवाडी भुयारी पादचारी मार्गाजवळील शेरे पंजाब हॉटेल चौकातून रेल्वे फाटकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जड वाहनांस बंदी

# पिंपरी बाजारपेठेत काही रस्त्यांवर जड वाहनांसाठी सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आलेले रस्ते –

– पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलावर आल्यानंतर डावीकडे वळताना व शगुन चौकाकडे जाण्यास
– भाटनगर कॉर्नर या ठिकाणी मेन बाजारामध्ये जाण्यासाठी
– शगुन चौक ते साई चौक, आर्य समाज चौक ते कराची चौक, शगुन चौक ते डीलक्स चौक काळेवाडी पुलापर्यंत, कराची चौक ते आंबेडकर रोड (रिव्हर रोड) भाटनगरपर्यंत
– साई चौक ते गेलार्ड चौक या रस्त्यावर

You might also like