Ban on Wheat Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ban on Wheat Exports | वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी (Ban on Wheat Exports) घातली आहे. केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं होतं. मात्र यानंतर आता निर्णय फिरविण्यात आल्याचे म्हटलं जातंय.(India bans wheat exports with immediate effect)

सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि संबंधित देशांच्या सरकारच्या विनंतीनुसार निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल, असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce and Industry) कृषी आणि प्रोसेस्ड फूड निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) याबाबत माहिती दिली आहे. कॉमर्स, शिपिंग, रेल्वे आणि इतर निर्यातदारांसह विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी गहू निर्यातीवर 1 टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. (Ban on Wheat Exports)

केंद्र सरकार मोरोक्को, ट्युनिशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन येथे भारतातून गहू निर्यात वाढवण्याच्या (India Wheat Production) तयारीत आहे. यासाठी व्यापारी शिष्टमंडळ देखील पाठवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. धान्याच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर भारताने 2022-23 साली विक्रमी 10 दशलक्ष टन गव्हाचे लक्ष्य ठेवल्याची माहिती मंत्रालयाकडून एका निवेदनात देण्यात आली होती. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या प्रमुख गहू उत्पादक राज्यांत निर्यातीबाबत बैठका आयोजित करण्याचीही मंत्रालयाची योजना आहे.

या दरम्यान, भारताने 2021-22 मध्ये गव्हाची विक्रमी निर्यात केली आहे. 7 दशलक्ष टन (MT) गहू निर्यात करून विक्रम केला. याचं मूल्य $2.05 अब्ज आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये एकूण शिपमेंटपैकी सुमारे 50 टक्के गहू बांगलादेशला निर्यात करण्यात आला आहे.

Web Title :Ban on Wheat Exports | india modi government bans wheat exports with immediate effect

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन