अमेरिकेत ‘अलबामा’मध्ये योगावरची 27 वर्षापासूनची ‘बंदी’ हटवली, ‘नमस्ते’वर मात्र ‘बॅन’

अलबामा : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या अलबामा लोकप्रतिनिधी सभेत विधिमंडळाकडून अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर योगाचे प्रशिक्षण घेण्यावर 27 वर्षांपासून लावण्यात आलेला प्रतिबंध हटवण्यात आला आहे. परंतु त्यांनी नमस्ते स्विकारण्यास नकार दिला आहे. ही रोख अशावेळी आणण्यात आली आहे जेव्हा जगभरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे आणि जगभरातील नेते मग ते डोनाल्ड ट्रम्प का असेनात सर्वच जण अभिवादनासाठी नमस्ते करताना दिसत आहेत.

योगावरील प्रतिबंध हटवण्यात आल्यानंतर भारतातील परंपरागत पद्धतीला प्रोस्ताहन मिळाले आहे. अलबामा शिक्षण विभागाने कट्टरपंथी समूहाच्या दबावात 1993 साली सार्वजनिक शाळांमध्ये योगासह सम्मोहन आणि ध्यानावर प्रतिबंध आणण्याच्या पक्षात मतदान केले होते. डेमोक्रेटिक पार्टीचे आमदार जेरेमी ग्रे द्वारा सादर करण्यात आलेल्या योग विधेयकावर मंगळवारी मतदान झाले, ज्याच्या बाजून 84 तर विरोधात 17 मते मिळाली.

नमस्तेवर प्रतिबंध –
अलबामा लोकप्रतिनिधी सभेने योगवरील प्रतिबंध हटवले असले तरी नमस्तेचा वापर करण्यावर प्रतिबंध कायम आहेत. आता हे विधेयक राज्याच्या सिनेटमध्ये पाठवण्यात येईल. जर तेथे मंजुरी मिळाली तर गर्व्हनर त्यावर हस्ताक्षर करेल, त्यानंतर हा एक कायदा बनेल. यासह केजी ते 12 वी शाळांमध्ये 27 वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेले प्रतिबंध काढण्यात येतील.

विधेयकानुसार, आता केजी पासून 12 पर्यंतच्या शाळेत योगा शिकवण्याचे निर्देश दिले परंतु ते अनिवार्य नाही. विधेयकात लिहिले आहे की शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग करणं किंवा न करणं दोन्ही पर्याय देण्यात येतील. ते अनिवार्य नसेल.

नमस्तेची लोकप्रियता वाढली –
जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या संक्रमणानुसार लोक भारतीय अभिवादनाचा वापर करत आहेत. एकमेकांना हस्तांदोलन करण्याऐवजी ते नमस्ते करत आहेत. कारण याने सुरक्षित अंतर राहते आणि व्यक्तीचे विनम्रतेने अभिवादन करता येते. जगभरातील अनेक नेते आता हाय, हॅलो, हस्तांदोलनाऐवजी नमस्ते करत आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचे स्वागत नमस्तेनेच केले. ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सने देखील असेच काहीसे केले. त्यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केले परंतु त्यानंतर लगेचच नमस्ते केले. फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅनुअल मॅक्रोन यांनी स्पेनचे राजे फिलिप यांचे सोमवारी नमस्ते करत अभिवादन केले होते. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील देशातील लोकांना सल्ला दिला की कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी भारतीय संस्कृतीप्रमाणे नमस्ते करा, हस्तांदोलन टाळा.