धनंजय मुंडे यांच्यासह 8 जणांच्या मालमत्‍तेवर टाच

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

 

सर्वत्र गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळयाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली असून परळीमधील जगमित्र सुतगिरणी कर्ज घोटाळया प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 8 जणांच्या मालमत्‍तेवर टाच आणण्यात आली आहे. आगामी काळात त्या मालमत्‍तेची विक्री अथवा मालमत्‍तेबाबत कुठलाही व्यवहार करता येणार नाही. धनंजय मुंडे यांच्यासह इतरांच्या अडचणीत भर पडली आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a3f9a5b-b731-11e8-a2aa-592098de36b1′]

मालमत्‍तेवर टाच आणण्याबाबत अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने आदेश काढले आहेत. सदरील घोटाळयाची न्यायालयीन प्रक्रिया अनेक वर्ष प्रलंबित होती. आता ती सुरू झाली आहे. न्यायालयाने जगमित्र सुतगिरणी प्रकरणी 3 कोटी रूपयांची वसुली करण्याकरिता धनंजय मुंडे यांचे घर संत जगमित्र सुत गिरणीचे कार्यालय तसेच इतर मालमत्‍तेवर या पुढे व्यवहार करता येणार नाही तसेच त्यामधुन कोणताही आर्थिक फायदा घेता येणार नसल्याबाबतचे आदेश दिले आहेत. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या जलालपुर, देशमुख टाकळी आणि कौडगाव येथील शेतजमिनीसह परळीच्या अंबाजोगाई रोडवरील घरावर प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या करवीर तालुका संपर्क मेळाव्यात प्रचंड गोंधळ

जिल्हा सहकारी बँक घोटाळयाची राज्यभर चर्चा झाली होती तसेच धनंजय मुंडे यांच्यासह इतर जण यामध्ये अडचणीत येणार असल्याचे भाकित देखील बीडमधील राजकीय मंडळींनी व्यक्‍त केले होते. न्यायालयाने मालमत्‍तेवर टाच आणण्याचे आदेश दिल्याने परळी आणि बीड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात घोटाळयाच्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आणखी काय-काय निर्णय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.