आता Tik-Tok App वर बंदी येणार

मद्रास : वृत्तसंस्था – Tik-Tok Appने तरुणाई आणि लहान थोरांपासूनते थेट जेष्ठ नागरिक आणि वृद्धांमध्येही क्रेझ निर्माण केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत केद्र सरकारला त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सरकारने निर्णय घेतला तर, देशातही  TikTok या ॲपवर बंदी येऊ शकते.

भारतात Tik-Tok APP प्रचंड लोकप्रिय झाले आहे सामाजिक कार्यकर्ते मुथू कुमार यांनी टीक टॉकविरोधात याचिका दाखल केली होती. पोर्नोग्राफीला उत्तेजन, संस्कृतीचा ऱ्हास, आत्महत्येला टीक टॉक उत्तेजन देत असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.  मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर या ॲपच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.  न्यायालयाने या ॲपच्या माध्यमातून बनवण्यात आलेले व्हिडिओ मीडियामधून प्रसारित करण्यासही बंदी निर्देश दिले आहेत. तसेच मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत केद्र सरकारला त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

टीक टॉक प्रसिद्ध चायनीज ॲप असून भारतामध्ये तब्बल ५४ लाख ॲक्टीव्ह यूझर आहेत. या App च्या माध्यमातून युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवतात आणि ते शेअरही करु शकतात. . या ॲपच्या माध्यमातून बॉलिवुडच्या संवांदांपासून ते विनोद आणि डान्सचे अनेक व्हिडिओ सहजपणे बनवता येतात.