Coronavirus : मासे तसेच इतर सी-फूड खात असाल तर सांभाळून, UN नं दिला ‘इशारा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू जगातील 204 देशांमध्ये पोहोचला आहे आणि आतापर्यंत 14 लाखाहून अधिक लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत. जगभरात या संसर्गामुळे 82,000 हून अधिक लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे संक्रमण (Covid19) वुहानमधील सीफूड मार्केटमधून पसरले होते. संयुक्त राष्ट्रांनी (UN) मंगळवारी जगातील सर्व देशांना असा इशारा दिला आहे की अशी बाजारपेठ अन्य देशांमध्येही संक्रमणासाठी सर्वात अनुकूल जागा ठरू शकते.

संयुक्त राष्ट्राचे जैवविविधता प्रमुख म्हणाले की, चीनच्या कोरोना विषाणूने प्रभावित वुहान शहरातील हुआनान सीफूड मार्केटसह अशा बाजारांपासून संक्रमणाचा धोका जास्त आहे. जगभरातील वन्यजीवांच्या विक्री आणि वापरावर कडक नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. हुआनान सीफूड मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या वन्यजीवांना कोरोना विषाणूच्या साथीचा स्रोत मानला जातो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना साथीच्या उद्रेकानंतर हूआनान बाजार बंद करण्यात आला होता.

प्राणी आणि सीफूड मार्केटपासून सर्वात मोठा धोका

जैविक विविधतेवरील यूएन कन्व्हेन्शनचे कार्यकारी सचिव एलिझाबेथ मारुमा म्रेमा यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त सांगितले की, ‘चीनच्या वुहानमधील हुआनान सीफूड मार्केट सारख्या आशियातील काही ठिकाणी वेट बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बाजारपेठा, जिथे जिवंत मासे, मांस आणि इतर वन्यजीव विकले जातात, ते या संसर्गाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे घटक आहेत कारण हा जागतिक वन्यजीव व्यवसाय आहे.’ ते म्हणाले की, अन्नधान्य बाजारात जिवंत प्राण्यांची संख्या कमी करण्यासारख्या काही देशांद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भविष्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होईल. यासाठी जगभरातील वन्य प्रजातींच्या विक्री व वापरावर कठोर नियंत्रण ठेवले पाहिजे.

चीनमध्ये मोठ्या बाजारपेठा उघडल्या आहेत

चीनने असा दावा केला आहे की त्यांनी कोरोना संक्रमणावर मात केली असून बुधवारपासून त्यांनी वुहानमध्येही 76 दिवसांपासून असलेला लॉकडाऊन संपवला आहे. एका वृत्तानुसार जनावरांच्या बाजारपेठा येथे पुन्हा सुरू झाल्या आहेत. कुत्री, मांजरी, वटवाघूळ व विंचू उघडपणे विकले जात आहेत. गुइलिन प्रांताचा बाजार उघडला आहे. गुइलिनच्या डोंगगुआन मधील मांस बाजार पूर्वीसारखेच सुरु झाले आहेत आणि पहिल्यापेक्षा जास्त गर्दी तेथे दिसून येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like