दूध आणि केळी एकत्र खात असाल तर व्हा सावध, होऊ शकतात अनेक आजार, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बरेच लोक वजन वाढवण्यासाठी दुध आणि केळी एकत्र खातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की केळी आणि दुध एकत्र खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीराला ग्रस्त करू शकतात. दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने आरोग्यासंबंधी कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.

सायनस होण्याची शक्यता
एका अभ्यासानुसार, केळी आणि दूध एकत्र दीर्घकाळ खाल्ल्यामुळे पाचन तंत्रावर परिणाम होतो. यामुळे सायनस होण्याची शक्यताही वाढते. म्हणून जर तुम्ही दूध आणि केळी एकत्र खात असाल, तर आजच ते खाणे बंद करा.

ऍसिडिटीची समस्या होऊ शकते
बघायला गेल्यास दूध आणि केळी दोन्ही पौष्टिक आहे. पण दोन्ही एकत्र खाल्ल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला हे दोन्ही खायचे असेल, तर लक्षात ठेवा की त्यांच्यात सुमारे २० मिनिटांचा फरक असावा. तसे केले नाही तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रस्त होऊ शकतो.

शरीरात विषारी घटकांचा प्रभाव निर्माण करते
आयुर्वेदानुसार, कोणतेही घन पदार्थ आणि द्रव पदार्थ एकत्र खाऊ नयेत. असे झाल्यास शरीरात विषारी घटकांचा प्रभाव निर्माण होऊ लागतो. तसेच शरीराच्या अवयवांचे कार्य देखील प्रभावित होते.

मेंदूवर परिणाम होतो
दूध आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीर बराच वेळ जड राहते. या दोन गोष्टींचे एकाच वेळी सेवन केल्यास मेंदूरही परिणाम होऊ शकतो.