गर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात बायकोनं रेडहॅन्ड पकडलं, पुढं झालं असं काही

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका विवाहित व्यक्तीला त्याच्या गर्लफ्रेन्डला डोसा खायला घेऊन जाणे चांगलेच महागात पडले. त्याच्या पत्नीने त्याला हा कारनामा करताना रंगेहाथ पकडले आणि त्याची गच्चांडी धरून थेट पोलीस ठाण्यात घेऊन गेली. या प्रकरणी पत्नीने पती विरोधात तक्रार दिली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे मंगळवारी सायंकाळी त्यांच हे लफड समोर आले.

आनंद विश्वकर्मा असे या पती महाशयाचे नाव आहे. बांदा येथील राजकीय निर्माण निगममधील ज्यूनिअर इंजिनिअर आनंद विश्वकर्मा आपल्या गर्लफ्रेन्डला हनुमान मंदिराजवळ डोसा खाण्यास घेऊन गेला होता. कारमध्ये व्यवस्थित बसून डोसा खाण्याचा त्यानी प्लॅन केला होता. पण त्याच्या या प्लॅनवर त्याच्या पत्नीने पाणी फेरल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विश्वकर्मा यांनी प्लेटमध्ये डोसा घेऊन कार बसणार इतक्यात त्याची पत्नी तिथे हजर झाली. ती एकटी नाही तर भावालाही सोबत घेऊन आली. पत्नी पतीला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत कारममध्ये रंगेहाथ पकडले अन तिथेच गोंधळ घातला. वाद इतका वाढला की, दोघांना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पत्नी म्हणाली की, तिला पतीच्या रंगेलपणाबाबत चांगलंच माहीत आहे. तिच्या पतीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यासाठी तो अनेक शहरांमध्ये फिरत राहतो. आता सगळा भांडाफोड झाल्यामुळे बिथरलेल्या पतीने यावर काहीही समाधानकारक उत्तर दिले नाही. पण तो स्वत:ला निर्दोष सांगत राहिला. इकडे भडकलेल्या पत्नीने पती विरोधात पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर काही कारवाई करण्याऐवजी ही घटना सामान्य वाद मानत आरोपी ज्यूनिअर इंजिनिअरला इशारा देऊन सोडून दिले.