Bandatatya Karadkar | ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांची प्रकृती खालावली; पुण्यातील हॉस्पिटल मध्ये केले दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिध्द ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार दिनानाश मंगेशकर रूग्णालयात सुरू करण्यात आले आहेत.

आज सकाळी फलटण येथील आश्रमात त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. (Bandatatya Karadkar) त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांच्या शरीरात रक्ताची गुठळी झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.

व्यसनमुक्त भारत, गोहत्याबंदी कायदा व्हावा यासाठी त्यांनी वारंवार मागणी केली होती. असे त्यांचे अनेक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. त्यांनी मध्यंतरी केलेल्या एका विधानामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते.

त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी विचारांना जोरदार लक्ष केले होते. महात्मा गांधीजींचा अहिंसावाद आणि महात्मा गांधीजींचं हिंदूत्व दोन्हीही पक्षपाती असल्याचे वक्तव्य त्यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या स्मृतीस्थळावर केले होते. तसेच यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी यांना म्हाताऱ्या असा देखील उल्लेख करण्यात आला होता.

तसेच, राज्यातील नेते आणि त्यांची मुले दारू पितात. काही दारू पिऊन रस्त्यावर पडतात.
त्याचे पुरावे देखील आहेत. असा दावा त्यांनी केला होता.
इतकचं नाही तर बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्यानंतर या प्रकरणावर बंडातात्या यांच्याविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. (Bandatatya Karadkar)

दरम्यान, त्यांना अचानक रूग्णालयात दाखल केल्यामुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना करण्यात येत आहे. (Bandatatya Karadkar)

Web Title :-Bandatatya Karadkar | bandatatya karadkar condition deteriorated admitted todinanath mangeshkar hospital pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय