Bandatatya Karadkar | ‘मुख्यमंत्र्यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पंढरपूरला येणं टाळावं’ – बंडातात्या कराडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही आषाढी वारी (Ashadhi wari) राज्य सरकारने रद्द केली होती. यावर हभप बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी वारकऱ्यांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यावरून वाद निर्माण झाला होता. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा होणार असून बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी याला विरोध दर्शवला आहे.

मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी (Shri Vitthal Rukmini) मातेची पूजा पार पडणार आहे. या पूजेला व्यसनमुक्ती युवक संघाचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी विरोध दर्शवला आहे. बंडातात्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगून पांडुरंगाच्या पूजेला येण्याचं टाळावे असं बंडातात्या म्हणाले.

बंडातात्या पुढे म्हणाले, ज्या पद्धतीने गेले चार महिने वारकऱ्यांचे (Pilgrimage) आंदोलन गुंडाळण्यात आले त्यावरुन महाराष्ट्रात भगव्या झेंड्याच राज्य आहे, असे वाटत नाही. भगव्या झेंड्याचा अपमान सुरु असून, वारकऱ्यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात. वारकऱ्यांच्या पोशाखात चालू नका असा पोलीस दम देतात. दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे आपण रद्द केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही, असेही बंडातात्या म्हणाले.

Web Titel :- Bandatatya Karadkar | chief minister uddhav thakrey should avoid coming pandharpur says bandatatya karadkar in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक