Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना पोलिसांनी (Police) आज (शनिवार) पहाटे ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील दिघी (Dighi) येथे पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेतले असून वडमुखवाडी-चर्‍होली (Wadmukhwadi-Charoli) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.bandatatya karadkar detained by police

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पायी वारीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केली होती. मात्र, कोरोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. शुक्रवारी आळंदी (Alandi) येथे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या (Mauli) पालखी (sant dnyaneshwar maharaj palkhi) सोहळ्याने प्रस्थान ठेवले. त्यानंतर पालखी ही मंदिरातच ठेवण्यात आली. परंपरेनुसार पालखी आळंदीहून निघून आज पुण्यात येते. त्यानुसार पायी वारी करणारच, अशी भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकर्‍यांनी पायी वारी सुरु केली.

त्यावेळी बंडातात्या कराडकरसह (Bandatatya Karadkar) इतर वारकर्‍यांना दिघी (Dighi) येथे पोलिसांनी अडविले. पायी वारी करु नये, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र, ते ऐकून घेण्यास तयार नसल्याने त्यांना स्थानबद्ध केले आहे. त्यांना चर्‍होली येथील  संकल्प मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. तेथे वारकर्‍यांनी भजन सुरु केले आहे.

दुसरीकडे गणेश महाराज यांनी काही वारकर्‍यांसह हडपसरपासून (Hadapsar) पायी वारी करण्यास प्रारंभ केला होता.
त्यांनाही पोलिसांनी (Police) अडविले असून समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे.
आळंदी (Alandi) येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकर्‍यांची तपासणी करण्यात आली होती.
त्यात काही वारकरी (Warkari) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे प्रशासनाने आळंदी (Alandi) आणि देहु (Dehu) येथे निर्बंध लागू केले असून पालखी मार्गावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Web Title : bandatatya karadkar detained by police

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया