Bandatatya Karadkar | बंडातात्या कराडकर यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारने घेतलेल्या वाइन (Wine) विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना, महिला नेत्यांबद्दल (Women Leaders) वादग्रस्त टिप्पणी (Controversial) केल्याबद्दल कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) माजी नगरसेविका अ‍ॅड. रुपाली पाटील ठोंबरे (Adv. Rupali Thombre Patil) यांनी बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्यावर पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (First Class Magistrate) यांच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. अशी माहिती फिर्यादी यांचे वकील विजयसिंह ठोंबरे (Adv Vijaysinh Thombare) यांनी दिली. दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये आरोपीवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

 

दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की, आरोपीने जाणीवपूर्वक कोणताही पुरावा नसताना फिर्यादी यांच्या महिलांच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर ‘सुप्रीया ताई दारु पिवून रस्त्यावर पडलेले फोटो ढिगाने मिळतील तुम्हाला राजकारणात यायच्या अगोदर सगळ्या जगाला माहीत आहे!’ असे बेताल वक्तव्य महिलांच्या विरुद्ध आहे व मानहानीकरक वक्तव्य वारकरी पंथातील असताना देखील केलेले आहे. या प्रकरणात फिर्यादी तर्फे अ‍ॅड विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड हितेश सोनार (Adv. Hitesh Sonar), ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे (Adv Digvijay Thombare) व विष्णू होगे काम पाहत आहे.

काय म्हणाले बंडातात्या?
सुपर मार्केटमध्ये (Supermarket) वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका होत आहे.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी साताऱ्यात (Satara) आंदोलन केले होते.
या आंदोलनादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर राज्यातील महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती.

 

वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारु पितात.
तसेच ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत म्हण आहे.
उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने (Government) दारु विक्रीचा निर्णय घेतल्याचे कराडकर यांनी म्हटले होते.

 

Web Title :- Bandatatya Karadkar | First case filed against Bandatatya Karadkar in Pune court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | विना इंटरनेट सुद्धा जाणून घेऊ शकता आपल्या PF अकाऊंटचा बॅलन्स, करावे लागेल ‘हे’ छोटे काम, जाणून घ्या पद्धत

 

Avneet Kaur New Car | अवघ्या 20 वर्षाच्या अवनीत कौरनं खरेदी केली चक्क 2 कोटीची Range Rover !

 

Multibagger Stocks | 60 पैशाच्या स्टॉकनं दिले छप्परफाड रिटर्न ! वर्षभरात 3533 टक्के परतावा; 1 लाखाचे झाले 36 लाख, जाणून घ्या