पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bandatatya Karadkar | व्यसनमुक्तीचे ह.भ.प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी आता एका वक्तव्याबद्दल माफीनामा दिला आहे. ‘राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे (Supriya Sule), पंकजा मुंडे (Pankaja Munde) या दारू पितात,’ असं विधान बंडातात्या कराडकर यांनी गुरुवारी सातारा (Satara) येथे केले होते. तर, इंदापूर तालुक्यातील (Indapur) गोतोंडी येथे त्यांनी यावर खुलासा केला आहे. ‘ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केलेय, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागायला तयार आहे, असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.
बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) म्हणाले, ”ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे.
त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल, तर मी माफी मागतो.
त्यात कमीपणा कसला’, तर, ”मी सकाळी विविध विषयांवर बोललो; पण फक्त मोजकाच भाग दाखवला गेला. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळे माहीत आहे आणि उभ्या महाराष्ट्रालाही माहितीय, कोण दारू पितात. त्यात काही विशेष नाही. सरकार दारू प्या म्हणतेय. कारण सरकारला त्यामधून महसूल मिळतो.” असं ते म्हणाले.
–
दरम्यान, राज्य सरकारने (Maharashtra Government) सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने साताऱ्यामध्ये ‘दंडवत-दंडुका’ आंदोलन केले गेले.
त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनी याबाबत वक्तव्य केलं.
दरम्यान, इंदापूर तालुक्यात एका कार्यक्रमा दरम्यान आले असता त्यावेळी पत्रकारांनी त्यांना वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ”माझे चुकले असेल, तर मी माफी मागायला तयार आहे.
हा विषय आता वाढवू नका. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, कोण कोण दारू पितात,” असं त्यांनी म्हटलं आहे.
Web Title :- Bandatatya Karadkar | NCP MP supriya sule and BJP leader pankaja munde drink alcohol Apology from Bandatatya Karadkar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update