पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baner Pune Crime News | मुंबईला राहणार्या पतीने पत्नीसह बाणेर येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला. वाद झाल्याने पत्नीवर पतीने चाकूने वार (Stabbing Case) करुन तिच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीने आपल्या गळ्यावर, पोटावर चाकू खुपसून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Attack On Wife)
अमजद युसुफ मुल्ला (वय ३९, रा. विष्णुनगर, चेंबुर, मुंबई) असे पतीचे नाव आहे. तर पत्नी नसिमा मुल्ला याही गंभीर जखमी झाल्या असून दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत हॉटेल ग्रॅव्हीटी इनचे व्यवस्थापक गणेश कचरु लंके (वय ३६) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेर येथील हॉटेल ग्रॅव्हीटी इन हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद मुल्ला आणि नसिमा मुल्ला हे दोघे पतीपत्नी आहेत. दोघांमध्ये वाद झाल्याने नसिमा या पुण्यात रहायला आल्या. अमजद मुल्ला हे मुंबईहून पुण्यात आले होते. ते हॉटेल ग्रॅव्हीटी इन (Hotel Gravity Inn Baner) येथील रुम नंबर १०७ मध्ये उतरले. त्यांची पत्नी नसिमा याही हॉटेलमध्ये आल्या होत्या. ते एक दिवस हॉटेलमध्ये राहिले. त्यानंतर सोमवारी सकाळी रुममध्ये असताना त्यांच्यात वाद झाल्यावर अमजद मुल्ला याने चाकूने नसिमा यांच्या उजव्या हाताचे दंडावर व छातीवर चाकूने वार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच चाकूने अमजद मुल्ला याने स्वत:चे गळ्यावर व पोटामध्ये खुपसुन आत्महत्येचा प्रयत्न केला. नसिमा यांचा आरडा ओरडा ऐकून हॉटेलमधील कर्मचार्यांनी रुमकडे धाव घेतली. दोघांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्यांनी पोलिसांना कळविले. दोघांवरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दोघेही अधिक माहिती सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी व्यवस्थापकांची फिर्याद घेऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण (API Anil Kekan) तपास करीत आहेत.