ADV

Baner Pune Crime News | पुणे : अनैतिक संबंधातुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून, बाणेर परिसरातील घटना; गुन्हे शाखेने ठाणे जिल्ह्यातून आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baner Pune Crime News | पुणे शहरातील बाणेर भागातील धनकुडे वस्ती येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. ही घटना धनगुडे वस्ती येथे रविवारी (दि.9) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) युनिट चारच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath Thane) परिसरातून अटक केली आहे. अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) आरोपीने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Murder In Baner Pune)

नाना विठ्ठल चादर (वय-36 रा. वाकड गावठाण वाकड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा भीमराव सुरोसे (वय-40 रा. बालेवाडी गावठाण मुळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन विठ्ठल चादर (वय-34 रा. वाकड गावठाण, वाकड) यांनी रविवारी (दि.9) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात आयपीसी 302 नुसार गुन्हा दाखल केला होता.(Baner Pune Crime News)

आरोपी कृष्णा आणि मयत नाना हे एकमेकांचे मित्र होते. कृष्णा अंबरनाथ परिसरात कुटुंबासोबत राहत होता. 2016 मध्ये तो बालेवाडी परिसरात राहण्यास आला. बालेवाडीत आल्यानंतर त्याची ओळख नाना चादर याच्यासोबत झाली. आरोपीच्या नात्यातील एका महिलेसोबत नाना चादर याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी नाना याच्यावर चिडून होता.

कृष्णा आणि मयत नाना चादर यांना दारु पिण्याचे व्यसन होते. 7 जून रोजी रात्री चादर आणि त्याचा मित्र रामदास धनगुडे यांनी मोकळ्या जागेत दारु प्याली. दारुच्या नशेत नाना त्याच ठिकाणी झोपी गेला. धनगुडे तेथून निघून गेला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा याला गांजा ओढण्याची तलफ झाली. त्यामुळे तो गांजा ओढण्यासाठी मोकळ्या जागेत आला. त्यावेळी त्याने नाना चादर दारुच्या नशेत झोपल्याचे पाहिले. चादर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करुन कृष्णा पसार झाला.

गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तांत्रिक तपास करुन आरोपी कृष्णा सुरोशे याला अंबरनात परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाना चादर याचे नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आरोपीने सांगितले.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चार चे पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार वैभव मगदूम, हरीश मोरे, सारस साळवी, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, वैभव रणपिसे, नागेशसिंह कुंवर, एकनाथ जोशी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sonakshi Sinha-Zaheer Iqbal | ना मंगलाष्टका, ना फेरे, अन्य धर्मातील जहीर सोबत रजिस्टर मॅरेज करणार सोनाक्षी?, ‘या’ दिवशी असेल रिसेप्शन!

Gautam Adani | डिफेन्स सेक्टरमध्ये वाढणार गौतम अदानींचा दबदबा… UAE च्या कंपनीसोबत मोठी डील, बनवणार ड्रोन आणि मिसाईल