बोगस ‘आधार’कार्डच्या मदतीनं बनली बार ‘डान्सर’, आता ‘सेक्स’ रॅकेटमध्ये पकडली गेली ‘बांगलादेशी’

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये पोलिसांनी एका बांग्लादेशी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे ना की पासपोर्ट होता ना की वीजा. परंतु आधार कार्ड मात्र होते. याच आधार कार्डच्या आधारे ती कोलकत्यात डान्स बारमध्ये नोकरी करत होती. त्यानंतर वेश्या व्यवसायात आली. परंतु तिने पोलिसांना जे काही सांगितले ते धक्कादायक होते.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की तिने पश्चिम बंगालच्या 24 परगनामधून आधार कार्ड बनवून घेतले. त्यानंतर ती कोलकत्याच्या एका डान्स बारमध्ये काम करत होती.

डान्स बार पासून वेश्या व्यवसायापर्यंत
बांग्लादेशी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने सांगितले की कोलकत्याहून ती भुवनेश्वरला आली होती. तेथे तिने वेश्या व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

Prostitution

शारीरिक शोषणाच्या आरोप लावला तेव्हा झाला खुलासा
हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा बांग्लादेशी महिला चिंतामणिश्वर भागातील पोलीस ठाण्यात आली आणि तक्रार दाखल केली. तिने तक्रार दाखल केली की तिच्या बरोबर कटकरोड भागात एका हॉटेलमध्ये लैगिंक शोषण करण्यात आले. जेव्हा पोलिसांनी तिला आधार कार्ड मागितले तेव्हा कळाले की तिने पश्चिम बंगालमधून खोटे आधार कार्ड बनवून घेतले होते.

पोलिसांच्या तपासात झाले उघड
पोलिसांच्या तपासात उघड झाल्यानंतर ओडिशा पोलिसांची एक टीम पश्चिम बंगालला गेली. तेथे तपास केला तेव्हा कळाले की 24 परगानामध्ये अनेक बांग्लादेशी मुलींचा देह विक्रीचा व्यवसाय चालतो. तेथून कळाले की भुवनेशअवरमध्ये देखील बांग्लादेशी तरुणींचा देह विक्रीचा व्यवसाय चालतो.

40 बांग्लादेशी तरुणी भुवनेश्वरमधून ताब्यात
जेव्हापासून बंग्लादेशी तरुणींचा तपास सुरु केला तेव्हा लक्षात आले की बांग्लादेशी तरुणींचा व्यापार होत आहे. पोलिसांनी 20 ते 25 वर्षांच्या 40 तरुणींना ताब्यात घेतले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/