बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बंगळूरूमधील पूलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले आहे. काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही उड्डाणपुलाचे काल उद्घाटन करण्यात आले.

नागरिकांच्या सेवेसाठी बंगळूरु महापालिके ने 34 कोटी रुपये खर्च करून 400 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधला आहे, हा पूल येलहांका येथील मे. संदीप उन्नीकृष्ण मार्गावर आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आयुष्य वेचले, त्यामुळे उड्डाणपुलास या महान देशभक्ताचे नाव देणे योग्य आहे, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पूलाला नाव न देण्यासाठी काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला होता. मात्र, विरोध टाळूनही कर्नाटक सरकारने पूलाचे उदघाटन केले आहे.