‘या’ देशाचं क्रिकेट कंट्रोल बोर्डच करत होतं मॅच ‘फिक्सिंग’, माजी अध्यक्षांनीच सांगितल्यानं प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचे अनेक प्रकरणं घडली. त्या अनेक खेळाडू अडकले देखील. परंतू आता बांग्लादेशचे क्रिेकेट मंडळचं मॅच फिक्सिंग करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. बांग्लादेशचे क्रिेकेट समितीचे माजी अध्यक्ष हुसेन चौधरी यांनी हा धक्कादायक आरोप केला आहे. क्रिकेट जगतामध्ये बांग्लादेशचे क्रिकेट मंडळ हे मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराला उत्तेजन देते. ही गोष्ट अविश्वसनीय अशीच आहे. मी बऱ्याच वेळी हा मुद्दा उठवला होता असे चौधरी यांनी सांगितले.

बांग्लादेशच्या क्रिकेटपटूंनी संप पुकारला आहे. बांग्लादेशाच्या खेळाडूंनी संधी साधत संप पुकारल्याने भारताचा दौरा धोक्यात आला आहे. आपला पगार वाढवण्यात यावा म्हणून बांग्लादेशच्या क्रिेकेटपटूंनी संप पुकारला आहे. त्यामुळे बांग्लादेशचा भारतीय दौरा धोक्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेनंतर आता बांग्लादेशचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार होता, त्यामुळे आता ही समस्या सोडवण्यासाठी बांग्लादेश क्रिकेट मंडळाकडे फार कमी संधी असल्याचे सांगितले आहे.

बांग्लादेशचा संघ काही दिवसांमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. हा संघ टी – 20 सामना खेळणार आहे. या स्पर्धेसाठी बांग्लादेश कर्णधार म्हणून एक खास खेळाडू देणार आहे. भारताविरोधाच्या सामन्यासाठी बांगलादेशच्या पंधरा सदस्य खेळांडूची निवड करण्यात आली आहे. संघाचे कर्णधार पद शकिब अल हसन याच्याकडे सोपावण्यात आली आहे. बांग्लादेश विरोधात भारतीय संघ यांच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन टी – 20 आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे.

हा असणार बांग्लादेशचा संघ – शाकिब अल हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, नईम शेख, मुशफिकर रहीम, सौम्य सरकार, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अमिनुल इस्लाम, अल अमीन हुसैन, सफीउल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like