शेख हसीना पुन्हा होणार बांग्लादेशच्या प्रधानमंत्री 

बांग्लादेश : वृत्तसंस्था – काल रविवारी ३० डिसेंबर रोजी हिंसाचाराच्या गालबोटात बांग्लादेशमध्ये मतदान नोंदवून घेण्यात आले. या निवडणुकीचे निकाल आज संध्याकाळी घोषित होणार असून बांग्लादेशच्या मीडियाने एकमताने शेख हसीना यांचा विजय होणार असल्याचे म्हणले आहे. शेख हसीना या ‘बांग्लादेश अवामी लीग’ या पक्षाच्या नेत्या असून गत निवडणुकीत हि त्या निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयाची खात्री असल्याने त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाच्या जल्लोषाची चांगलीच तयारी केली आहे.

गोपालगंज मतदार संघातून शेख हसीना होणार मोठ्या फरकाने विजयी 

शेख हसीना या त्यांच्या गोपालगंज या मतदार संघातून २ लाखाच्या फरकानी विजयी होणार असून त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार असल्याचे अंदाज बांग्लादेशच्या मीडियाने बांधले होते. ते अंदाज आता सत्यात उतरताना दिसत आहेत. काल रविवारी चार वाजता मतदानाची समाप्ती होताच, लगेच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. या मतमोजणीत शेख हसीना  २ लाख २९ हजार ४१६ मतांनी विजयी झाल्या असून त्यांच्या विरोधातील बांग्लादेश नॅशनल पार्टीचे उमेदवार जालीन यांना फक्त १२३ मते मिळाली असून ‘इस्लामी आंदोलन बांगलादेश’ या पक्षाचे उमेदवार मोहम्मद मारुफ शेख यांना केवळ ७१ मते पडली आहेत.  या निकालावरून शेख हसीना यांची लोकप्रियता समजून येते.

तर बांग्लादेशच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता असून विरोधी पक्षांकडून निवडणूकीचे निकाल फेटाळण्यात आले आहे. विरोधी पक्ष नेते कमल हुसैन यांनी या निकालाच्या विरोधात बोलताना म्हणले आहे कि , या निवडणूकीचा निकाल हा अत्यंत धक्कादायक असून आम्ही फेर मतदान  घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र निवडणूक आयोगांकडून विरोधी पक्षाच्या विरोधाला कसलीच दाद दिली गेली नसून येत्या काळात शेख हसीना सत्ता रूढ होण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. शेख हसीना या चौथ्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान होणार असून त्यांच्या विजयाची खात्री त्यांच्या पक्षाला आधी पासूनच होती.

शेख हसीना यांच्या सोबत भारताचे संबंध 

शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताचे आणि बांग्लादेशचे संबंध चांगल्या पध्द्तीचे राहिले आहेत. त्याच्या कार्यकाळातच नरेंद्र मोदी यांनी बांग्ला देशाशी सीमा सुरक्षा करार केला होता. या करारा नुसार भारत बांग्लादेश सीमा सील करण्यात आली होती. या करारा नुसार भारतात होणारी बांग्लादेशी गुसखोरी थांबली होती. त्याच प्रमाणे भारत आणि बांगला देशचे अनेक व्यवहारात चांगले संबंध असल्याचे दिसून आले आहे. तर शेख हसीना यांची शेजारी असणाऱ्या भारत या मोठ्या देशाशी चांगले संबंध ठेवण्याची  विदेश नीती आहे.