ताज्या बातम्या

PM मोदींचा बांगलादेश दौरा आटोपताच मंदिरांवर हल्ला, 10 जणांचा मृत्यू

ढाका : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय बांग्लादेश दौरा आटपून मायदेशी परतल्यानंतर बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. रविवारी (दि. 28) कट्टर इस्लामवादी गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला आहे. तसेच एका ट्रेनलाही लक्ष्य केले आहे. यावेळी झालेल्या हिंसाचारात 10 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात हिंदुबहुल भारतात अल्पसंख्याक मुस्लिमांवर भेदभाव होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. राजधानी ढाक्यात शुक्रवारी झालेल्या आंदोलनांत डझनभर लोक जखमी झाले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराचा अन् रबराच्या गोळ्यांचा वापर केला होता. त्यानंतर मोदींच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो मुस्लिम कार्यकर्ते चितगाव आणि ढाक्यात रस्त्यावर उतरले होते. रविवारी आंदोलनकर्त्यांनी पूर्व बांग्लादेशातील हिंदू मंदिरावर हल्ला केला. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित केले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांच्याकडे कोरोना लसीचे 12 लाख डोस आणि 109 रुग्णवाहिका सोपवून मोदी भारतात परतले आहेत. मोदींनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय भारत आणि बांगलादेशात 5 करार झाले आहेत.

Back to top button