आता ‘इथं’ महिलांना लग्नासाठी द्यावी लागणार नाही ‘व्हर्जिनिटी’ Test : कोर्टाचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बांग्लादेश मध्ये महिलांना लग्नाच्या नोंदणी फॉर्म वर व्हर्जिनिटी सांगणे गरजेचे नाही. असा निर्णय बांगलादेशातील एका उच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नासाठी असलेल्या नोंदणी फॉर्म मधून ‘कुमारी’ हा शब्द बदलला आहे. त्यामुळे लग्नाच्या नोंदणी फॉर्म वरून व्हर्जिनिटी उल्लेख हटणार आहे. याच्या आधी महिलांना त्या व्हर्जिन आहे कि नाही हे सांगावे लागत होते.

उच्च न्यायालयाने सरकारला आदेश दिले कि, कुमारी शब्दाच्या जागी अविवाहित शब्द घ्यावा. तसं न्यायालय आपला पूर्ण निर्णय ऑक्टोबर महिन्यामध्ये देणार आहे. त्याच्या आधी महिलांना लग्नाआधी तीन पर्याय दिले जायचे ते म्हणजे कुमारी, विधवा, घटस्फोटित हे होय. व्हर्जिनिटी च्या उल्लेखाचा विरोध करणाऱ्या गटातील एक वकील अ‍ॅड. अयुन नहार यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की या निर्णयानंतर महिलांना समानता मिळविण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील.

बर्‍याच काळापासून लनासाठी असलेल्या नोंदणी फॉर्ममध्ये कुमारिका विचारल्याचा निषेध होत होता. हा उल्लेख बदलण्यासाठी मागची ५ वर्षे कायदेशीर लढाई सुरू होती. महिलांच्या वैयक्तिक गुप्ततेचे हनन होत असल्याचे बोलले जात होते. कोर्टाच्या निर्णयानुसार आता विवाह नोंदणीच्या वेळी महिलांना अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित असा पर्याय निवडाता येईल. पुरुषांनाही अशीच माहिती द्यावी लागेल. मात्र, याची अंमलबजावणी कधी होईल, याची माहिती सरकारकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –