बांगलादेशी मौलानाचा अजब फतवा, Facebook च्या ’हाहा’ Emoji चा वापर करण्यास म्हटले हराम, सांगितले हे लॉजिक

ढाका : वृत्त संस्था – Facebook|फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्सची दखल संपूर्ण जगभरातील लोकांच्या जीवनात आहे. फेसबुक (Facebook) चे यूजर बांगलादेशात सुद्धा आहेत. परंतु या दरम्यान बांगलादेशात मुस्लिम धर्मगुरु आणि चर्चित मौलाना अहमदुल्लाहने फेसबुकच्या ’हाहा’ इमोजीच्या विरूद्ध विचित्र फतवा जारी केला आहे. bangladeshi cleric issued fatwa against facebook haha emoji

फेसबुकवर पोस्ट केला व्हिडिओ
मौलाना अहमदुल्लाहने तीन मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि फेसबुकवर लोकांनी मौलानाची खिल्ली उडवली. यानंतर काही वेळातच त्यांनी फतवा जारी केला. सोबतच हे सुद्धा सांगितले की, हे कशाप्रकारे मुस्लिमांसाठी ’हराम’ आहे.

अहमदुल्लाह यांनी सांगितले हे लॉजिक
अहमदुल्ला यांनी म्हटले, आजकाल सर्वजण फेसबुकच्या हाहा इमोजीचा वापर लोकांची थट्टा करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही थट्टेसाठी हाहा इमोजीचा वापर करत असाल आणि कंटेंट पोस्ट करणार्‍याची इच्छा सुद्धा हिच असेल तर ठिक आहे. परंतु जर तुमच्या प्रतिक्रियेचा हेतू पोस्ट करणार्‍याचा उपहास करणे आहे किंवा टोचून बोलणे आहे किंवा थट्टा करणे आहे तर हे इस्लामसाठी पूर्णपणे हराम आहे. अल्लासाठी मी तुम्हाला विनंती करतो की, याचा वापर करू नका. एखाद्याची थट्टा उडवण्यासाठी हाहा इमोजीचा वापर करू नका.

सोशल मीडियावर मौलानाचे मोठा फॉलोवर
मौलाना अहमदुल्लाह यांचा हा 3 मिनिटाचा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखवेळा पाहिला गेला आहे. मौलाना अहमदुल्लाह यांच्या फेसबुक आणि यूट्यूबवर 30 लाखापेक्षा जास्त फॉलोवर आहेत.
अहमदुल्लाह बांगलादेशच्या नवीन पीढीचे मौलाना आहेत.
जे इंटरनेटवर जास्त सक्रिय आहेत.
ते नेहमी टीव्हीवर येत असतात आणि मुल्सिम बहुल बांगलादेशमध्ये धार्मिक चर्चा करतात.
मात्र, मौलानाच्या या व्हिडिओवर हजारोच्या संख्येने फॉलोवर्सने हाहा इमोजीने रिअ‍ॅक्ट केल्याने त्यांनी विरोध नोंदवला.

Web Titel : bangladeshi cleric issued fatwa against facebook haha emoji

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’