घुसखोरी करून वास्तव करणाऱ्या बांगलादेशी तरुणाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भारत-बांगलादेश सिमेवरून घोसखोरी करुन, भारतात प्रवेश करून, पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या चाकण एमआयडीसीमध्ये वास्तव करणाऱ्या एका २२ वर्षीय बांगलादेशी तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

सागरअली रफिकअली (२२, रा. वासुली फाटा, टेट्रा कंपनी पाठीमागे, मूळ पत्ता-मु. शोरूनपूर, पो. कुसुमपूर, ता. महेशपूर, जि. झिनयदा, बांगलादेश) याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भा. द. वि. क. ४६५, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४२, नियम ३ सह ६ पारपत्र १९५० सह परि ३ (१) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरिक कायदा १९४६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण येथे एक बांगलादेशी नागरिक वास्तव करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी वासुली फाटा येथील टेट्रा कंपनी येथून सागरअली याला ताब्यात घेतले.

सागरअलीची चौकशी केली असता तो कोणत्याही वैद्य कागदपत्राशिवाय तसेच सीमेवर असणाऱ्या मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय त्याने भारतात घुसखोरी केली. तसेच चाकण येथे बेकायदेशीरपणे राहत होता. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे भारत सरकारचे आधार आणि पॅनकार्ड बनविले आहे. सागरअली हा पंधरा दिवसापासून चाकण येथे एका ठेकेदाराकडे बांधकाम साईटवर काम करत होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like