खुशखबर ! आता ATM सारखा बँक खात्याचाही वापर करता येणार ; कोणत्याही बँकेतून करा ‘व्यवहार’, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता आपले खाते असलेल्या बँकेत जाऊन कॅश भरण्याची किंवा काढण्याची चिंता मिटणार आहे. कारण आता अशा कोणत्याही प्रकारे बँकिंग करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते असलेल्या बँकेत जाण्याची गरज भसणार नाही. तुम्ही ज्याप्रकारे कोणत्याही बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन त्यातून पैसे काढतात. तशाच प्रकार आता कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढू शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली.
एटीएम सारखा करा बँकेचा वापर –
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता प्रत्येक बँक एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. यामुळे RBI च्या मदतीने एक अशी व्यवस्था करण्यात येत आहेत की आपले खाते कोणत्याही बँकेत असो, कोणत्याही बँकेत बँकिंग करता येईल. जसे की तुम्ही एटीएमचा वापर करतात. कोणत्याही बँकेचे एटीएम तुम्ही कोणत्याही बँकेसाठी वापरतात त्याप्रमाणे तुम्ही याचा देखील वापर करु शकतात.
कोणत्याही बँकेतून करा तुमचे बँकेचे व्यवहार –
त्यापुढे असे ही म्हणाल्या की, तुमचे खाते एसबीआयमध्ये आहे, मात्र तुम्ही उपस्थित असलेल्या ठिकाणी बँक नाही, तर त्या भागात असलेल्या एखाद्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही बँकेचे व्यवहार करु शकतात. इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजच्या माध्यमातून लवकरच हे साध्य करण्यात येईल. ही आमची प्राथमिकता आहे.
लवकरच भारतभरात अशी सुविधा सरकार RBI च्या सहाय्याने आणू इच्छित आहे. यामुळे देशात बँकिंगचा वापर वाढणार आहे, या उद्देशाने सरकार प्रयत्नशील आहे. लोकांना बँकिगचा वापर वाढवा यासाठी या सुविधा लवकरच बँकामध्ये उपलब्ध होऊ शकतात. यामुळे लोकांचा एटीएम बंद असले तरी ताण कमी होईल, कारण लोकांना कोणत्याही बँकेचा वापर करुन आपले व्यवहार करता येतील.
घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !
‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय
पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी
केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान
दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’
‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय
असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य
व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका