आता ‘चेक’ तात्काळ होणार ‘क्लियर’, ‘या’ महिन्यापासून संपूर्ण देशात ‘सर्व्हिस’ सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चेक क्लियरन्सची गती वाढविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सप्टेंबरपासून देशभरात चेक टंकेशन सिस्टीम (सीटीएस) लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आज (गुरुवार) दिली आहे. आरबीआयने ही सिस्टीम 2010 मध्ये आणली होती. सध्या ही यंत्रणा देशातील ठरावीक शहरामध्ये कार्यरत आहे. सीटीएसमुळे ग्राहकांना त्यांचे धनादेश क्लियर करणे सोपे जाणार असून ग्राहकांचा बराच वेळ वाचणार आहे.

विकासात्मक आणि नियामक धोरणांबाबत आरबीआयने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशातील काही मोठ्या शहरांमध्ये कार्यरत सीटीएसच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर 2020 पासून देशभरात सीटीएस कार्यान्वित होणार आहे. सीटीएस ही एक सुरक्षित देवाण घेवाणीची प्रक्रिया आहे. यामध्ये चेक क्लियर करण्यासाठी ग्राहकाला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जाण्याची गरज नाही.

देशभरात सीटीएस बरोबर आरबीआय डीपीआय सुरु करणार आहे. देशात डिजिटल पेमेंट करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे लवकरच डिजिटल पेमेंट्स इडेक्स (डीपीआय) सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय बँकांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पेमेंट इकोसिस्टममधील संस्थाकडून डिजिटल पेमेंट्स आणि मॅच्युरिटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पेमेंट सिस्टीमधील संस्थांच्या आदेशानुसार ऑपरेट करण्यासाठी स्वय-नियामक संस्था (SRO) असणे आवश्यक आहे.