बँक अकाऊंटच्या चेक संदर्भातील नियम RBI नं बदलले, ‘या’ तारखेपर्यंत बदलावं लागणार Cheque Book

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन बँकिंग सुविधा आल्यानंतर चेक बुकची आवश्यकता कमी झाली आहे. कारण चेक बुकचा वापर कमी झाला आहे. चेक क्लिअरेंसची प्रक्रिया देखील सोपी बनवण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा आणण्याची तयारी सुरु केली आहे. आरबीआयने चेक ट्रांजेक्शन सुविधा संपूर्ण देशात लागू करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने सांगितले की सीटीएस फायदेशीर ठरले आहे त्यामुळे सप्टेंबर 2020 पर्यंत याचा वापर प्रत्येक ठिकाणी सुरु केला जाईल.

काय आहे सीटीएस सुविधा –
सीटीएसअंतर्गत तुमचा चेक क्लिअर होण्यासाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जावे लागणार नाही, यामुळे वेळेची बचत होईल आणि चेक देखील एका दिवसात क्लिअर होईल. सध्या चेक क्लिअर होण्यासाठी 2 – 3 दिवसांचा कालावधी लागतो, सीटीएसची सुरुवात 2010 मध्ये झाली होती.

कसे काम करते सीटीएस –
याअंतर्गत चेक क्लिअर करण्यासाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जावे लागणार नाही तर याचा इलेक्ट्रॉनिक फोटो पाठवला जातो, ज्यामुळे काम सहज आणि वेगाने होईल. याशिवाय एमआयसीआर बँड इत्यादी देखील पाठवले जाईल. यामाध्यमातून वेळेची देखील बचत होते. ज्यामुळे ही प्रक्रिया 24 तासात पूर्ण होते. ज्या ग्राहकांकडे सीटीएस मानकाचे चेक नाहीत त्यांना चेक बदलावे लागतील. हा मल्टी सिटी चेक आहे.

नवे चेक क्लिअरिंग सुविधेचे फायदे –
– या चेकची क्लिअरिंग 24 तासात होते.
– या चेकचा खोटा वापर करता येत नाही.
– देशातील कुठेही कोणत्याही बँकेत हा चेक क्लिअर करता येतो.
– पेपर क्लिअरिंगसंंबंधित असलेल्या रिस्कपासून सुटका मिळते.
– बँक आणि ग्राहक दोघांना देखील फायदा मिळतो.

फसवणूक होण्याची शक्यता कमी –
चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी आणि फसवणूकीचे प्रकार टाळण्यासाठी सीटीएस आणण्यात आला आहे. सीटीएसच्या माध्यमातून पडताळणी सहज आणि वेगाने होईल, ज्यामुळे फसवणूकीची संभावना कमी होईल. सीटीएसच्या पूर्वी चेक क्लिअर करण्यासाठी जास्त वेळ लागत होता, ज्यामुळे फक्त ग्राहकांनाच नाही तर बँकांना देखील समस्या उद्भवत होत्या.