Bank Customers Alert | ‘ही’ 11 Android App तुमच्या बँक अकाऊंटला करतील रिकामे, तात्काळ करा ‘डिलीट’, जाणून घ्या यादी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक अशी धोकादायक अँड्राईड अॅप (Android App) सापडली आहेत जी तुमचे नुकसान करू शकतात. सायबर सिक्युरिटी सिसर्चर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टनुसार, एकुण 11 अॅप आढळली (Bank Customers Alert) आहेत, ज्यांच्याद्वारे बँकिंग फ्रॉड (Banking fraud) च्या घटना घडू शकतात. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की ही अॅप आतापर्यंत 3,000 पेक्षा जास्तवेळा इन्स्टॉल केली गेली आहेत. तुम्ही सुद्धा यापैकी एखादे अॅप इन्स्टॉल केले असेल तर तुमच्यासाठी हे घातक ठरू शकते. यासाठी ताबडतोब (Bank Customers Alert) ते हटवा.
जोकर मालवेयरने संक्रमित मोबाइलद्वारे बँकिंग फ्रॉड केला जातो. सोबतच जोकर अँड्रॉइड अलर्ट सिस्टमद्वारे सुद्धा सर्व नोटिफिकेशनची परमिशन मिळवली जाते. या संशयित अॅपद्वारे हे मालवेयर फोनमध्ये पोहचतात. ही अॅप अतिशय धोकादायक आहेत.
ही आहेत धोकादायक अॅप
1. Free Affluent Message
2. PDF Photo Scanner
3. delux Keyboard
4. Comply QR Scanner
5. PDF Converter Scanner
6. Font Style Keyboard
7. Translate Free
8. Saying Message
9. Private Message
10. Read Scanner
11. Print Scanner
Web Title :- bank customers alert | if these 11 apps are in your phone then all the money will be withdrawn from your bank account delete it immediately bank fraud
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update