Bank Cuts Loan Rate | खुशखबर ! SBI, PNB सह ‘या’ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर, जाणून घ्या आता किती स्वस्त पडणार लोन?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bank Cuts Loan Rate | बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन होम लोन आणि कार लोनवर सूट देण्याची घोषणा केली. तत्पूर्वी भारतीय स्टेट बँकेने (SBI) सुद्धा होम लोनचे व्याजदर कमी करण्याची घोषणा (Bank Cuts Loan Rate) केली आहे. बँक ऑफ बडोदा होम लोन (Home Loan) आणि कार लोन (car Loan) वर सध्याच्या दरात 0.25 टक्केची सूट दिली आहे.

याशिवाय बँकेने होम लोनच्या प्रोसेसिंग फीमध्ये (Processing fee) सुद्धा सूट देण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या होम लोनचा व्याजदर 6.75 टक्के आणि कार लोन 7 टक्केने सुरू होते.

काय म्हटले बँकेने?

बँकेने एक वक्तव्यात म्हटले, ग्राहक कर्जाच्या जलद मंजुरीसाठी बँकेची वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅपवरून सुद्धा अर्ज करू शकतात. सोबतच डोअर स्टेप सर्व्हिस सुद्धा आहे.

बँकेचे महाव्यवस्थापक एच. टी. सोलंकी यांनी म्हटले, पुढील सणांदरम्यान रिटेल लोनवर या ऑफरसह आम्ही सध्याच्या ग्राहकांना सणाची भेट देणार आहोत.
यासोबतच बँकेच्या नवीन ग्राहकांना सुद्धा होम आणि कार लोन घेण्यासाठी आकर्षक संधी देणार आहोत.

PNB ने स्वस्त केले लोन

सणासुदीसाठी पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना कर्जाची उपलब्धता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी एक फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर लाँच केली आहे.
या अंतर्गत होम लोन, कार लोन, संपत्ती लोन, पर्सनल लोन, पेन्शन लोन आणि गोल्ड लोनवर सुद्धा सेवा शुल्क आणि कागदपत्र शुल्क माफ करत आहे.
पीएनबी आता होम लोनवरर 6.80% आणि कार लोनवर 7.15% पासून सुरू होणारे आकर्षक व्याजदर प्रदान करते.

बँक 8.95% ने व्यक्तीगत कर्ज देत आहे. जे उद्योगात सर्वात कमी आहे.
बँकेने आकर्षक व्याजदरावर होम लोन टॉप-अप देण्याची सुद्धा घोषणा केली आहे.
ग्राहक देशभरात पीएनबीच्या कोणत्याही शाखेच्या माध्यमातून किंवा डिजिटल चॅनलच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

 

SBI ने अगोदरच कमी केले आहेत व्याजदर

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने सुद्धा फेस्टिव्ह सीझन पाहता होम लोनचे व्याजदर कमी करण्याची घोषणा केली होती.
यामध्ये क्रेडिट स्कोअरशी संबंधीत कितीही रक्कमेच्या कर्जाचा समावेश आहे, ज्यावर 6.70 टक्केच्या कमी केलेला व्याजदर दिला जाईल.
आता 75 लाख रुपयांपर्यंत होम लोनवर व्याजदर एक समान असेल.

75 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन स्वस्त

अगोदर 75 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतल्यानंतर 7.15 टक्के व्याजदर भरावा लागत होता.
फेस्टिव्ह ऑफर्समध्ये आता कोणत्याही रक्कमेसाठी 6.70 टक्के किमान व्याजदर होम लोनवर मिळवू शकता. यामुळे 45 बीपीएसची बचत होते, ज्यामुळे 30 वर्षाच्या कालावधीत 75 लाख रुपयांच्या कर्जावर 8 लाख रुपये वाचवू शकता.

याशिवाय, विना-पगारदार कर्जदारासाठी लागू व्याजदर एका पगारदार कर्जदाराच्या तुलनेत 15 बीपीएस जास्त होते.
परंतु एसबीआयने आता पगारदार आणि विना पगारदार कर्जदारातील हे अंतर हटवले आहे.
आता, संभाव्य होम लोनसाठी कर्जदारांकडून कोणताही ऑक्यूपेशन-लिंक्ड व्याज प्रीमियम घेतला जात नाही. यामुळे विना-पगारदार कर्जदारांची 15 बीपीएसची आणखी व्याज बचत होईल.

 

Web Title : Bank Cuts Loan Rate | sbi and bank of baroda cuts home and car loan rates check latest rates details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | येत्या रविवारी पुणे अन् पिंपरीमधील सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहणार, हॉटेल अन् रेस्टॉरंटबाबत झाला ‘हा’ निर्णय (व्हिडिओ)

Mumbai-Nashik Highway | दुर्देवी ! गणपती दर्शनावरून परतणार्‍या माय-लेकराचा अपघातात मृत्यू

PM Kisan | शेतकरी ‘या’ पध्दतीनं पुढील हप्त्यासोबत मिळवू शकतात मागील अडकलेला हप्ता, जाणून घ्या काय करावे लागेल?