बँक दरोड्यातील आरोपीचे शरद पवारांसोबत फोटो सेशन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात लोकसभा निवडणूकीचे पघडम वाजायला सुरुवात झाली असताना सर्व राजकीय पक्षांनी पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात जामीनावर सुटलेल्या बँक दरोड्यातील आरोपीला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशष म्हणजे या शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या सोबत फोटो सेशन केले. ज्यामध्ये आरोपी शरद पवार यांच्या जवळ उभा आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68372d5b-c4a3-11e8-9300-d17246eb2746′]

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ७० लाख रुपयांच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याचाही समावेश होता.

[amazon_link asins=’B0756ZBZ5P,B07DZZKBBL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8faa0e46-c4a3-11e8-bb11-b16f7d90e018′]

सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटण्यात आल्याने खळबळ माजली होती. या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे तत्कालीन युवा जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याचं नाव पुढे आलं होतं. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शिष्टमंडळात समावेश होतोच कसा, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मद्यधुंद पीएमपीएल चालक पोलिसांच्या ताब्यात, वाचले ४० प्रवाशांचे प्राण

मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसोबत भेट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फोटो सेशन केलं, ज्यामध्ये हा दरोड्यातील आरोपी दिसत आहे. राष्ट्रवादीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जाहिरात.