जर Yes Bank बुडाली तर तुमच्या अकाऊंटमध्ये जमा अससलेल्या रक्कमेपैकी किती पैसे सुरक्षित ! जाणून घ्या RBI नियम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आरबीआयने एस बँकेसंदर्भातील नियम आणखी कठोर केला आहे. माहितीनुसार, आता ग्राहक 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढू शकणार नाहीत. 3 एप्रिलपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने बँकेचे व्यवस्थापन ताब्यात घेत स्पष्टीकरण दिले की, जरी कोणतेही खाते असले तरी केवळ 50,000 रुपये काढले जाऊ शकतात. अर्थ मंत्रालयाने एस बँकेसाठी आदेश जारी केला आहे. दरम्यान, एस बँकेसंदर्भातील ही बातमी पसरताच बँकेच्या एटीएमवर लोकांची प्रचंड गर्दी जमली. बँकेची नेट बँकिंग आणि एटीएम सेवाही बंद करण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहक अस्वस्थ होत आहेत, परंतु यामुळे एस बँकेच्या ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कारण सरकारच्या तरतुदीनुसार जरी बँक बुडाली तरी ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतात.

एखादी बँक बुडल्यास सगळं दिवाळं निघत. तर त्याच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी जास्तीत जास्त 1 लाख रुपये मिळतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सहाय्यक डिपॉजिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) च्या मते, विमा म्हणजेच ठेवीची रक्कम विचारात न घेता ग्राहकांना 1 लाख रुपये मिळतील. त्यात बचत, मुदत ठेवी, चालू आणि आवर्ती ठेवी खाती आहेत. डीआयसीजीसी कायदा 1961 च्या कलम 16 (1) च्या तरतुदीनुसार बँक बुडाल्यानांतर डीआयसीजीसी प्रत्येक ठेवीदारास पैसे भरण्यास जबाबदार असेल. जर आपल्याकडे एकाच बँकेच्या एकाधिक शाखांमध्ये खाते असेल तर सर्व खात्यात पैसे आणि व्याजाची रक्कम जोडली जाईल आणि केवळ 1 लाखांपर्यंतची ठेवी सुरक्षित मानली जातील.

इतकेच नाही तर आपल्याकडे कोणत्याही एका बँकेत एकापेक्षा जास्त खाते आणि एफडी असल्यास, बँकेचे डीफॉल्ट किंवा बुडल्यानंतरही आपल्याला फक्त एक लाख रुपये मिळण्याची हमी आहे. ही रक्कम कशी मिळवायची यासाठी डीआयसीजीसीने मार्गदर्शक सूचना निश्चित केली आहे. डीआयसीजीसीने म्हटले की, जो कोणी बँकेत पैसे जमा करतो त्याला जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळतो. आपण किती रक्कम बँकेत जमा केली आहे हे महत्त्वाचे नाही.

दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये (पीएमसी) घोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने त्यावर बंदी घातली होती आणि या घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासक नेमले होते. सुरुवातीला आरबीआयने पीएमसी बँकेच्या ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यास बंदी घातली होती आणि त्यांना सहा महिन्यांत केवळ 10,000 रुपये काढण्याची परवानगी दिली होती. मात्र, नंतर आरबीआयने पैसे काढण्याची मर्यादा 50 हजारांवर वाढविली. या घटनेनंतरच बॅंकांमधील ठेवीदारांचे केवळ 1 लाख रुपये सुरक्षित असल्याची चर्चा आहे.