बँक कर्मचा-यांचा देशव्यापी संप, नागरिकांची गैरसोय

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ दोन टक्क्यांची वाढ केल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) रोजी देशभरातील सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू)ने या संपाची हाक दिली आहे. महिन्याच्या अखेरीस झालेल्या या संपामुळे सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. साधारण महिन्याच्या अखेरीस पगार दिला जातो मात्र आता बँका बंद असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

 

बँक संघटनांनी संपाची हाक दिल्यामुळे आज ठिकठिकाणच्या सरकारी बँकांच्या बाहेर संपाची माहिती देणारे फलक झळकलेले दिसत आहेत. त्यामुळे दैनंदिन कामासाठी बँकांमध्ये आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत फिरावे लागले. बँकांच्या संपाचा परिणाम एटीएम वर देखील झाल्याचे दिसून आले. काही एटीएम मध्ये पैसे नसल्याचे आढळून आले.

 

पुणे शहरात देखील आज सर्व बँकेच्या वतीने संप पुकारण्यात आला होता . यावेळी पगारवाढीच्या मागणी बरोबरच अन्य मागण्यासाठी शहरातील बॅंक आॅफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेबाहेर बॅंक कर्मचाऱ्यानी आंदोलन केले. यावेळी शहरातील अनेक बॅंक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. किशोर ठाकूर, सुरेश साबळे, स्मृती बनसोड, निला अाग्रवाल, पुजा सिन्हा, सचिन, अनुपकूमार, रामचंद्र तिवारी अशी यातील काही कर्मचा-यांची नावे आहेत.