एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींचा मृतदेह सापडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला. कल्याणमधील हाजीमलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या ३७ व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. तसेच ठाणे जिल्ह्यात निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह फेकल्याची माहिती मारेकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांची पथके रवाना झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला आहे.

सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर ते लोअर परेलहून मलबार हिलच्या दिशेने निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही, मात्र ते घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले.सिद्धार्थ संघवींचा फोन बंद होता. रात्रभर वाट पाहून शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ६ सप्टेंबरला तक्रार दिली. शुक्रवारी कोपरखैरणेच्या सेक्टर १९ मध्ये त्यांची कार सापडली. त्यामध्ये रक्ताचे डाग, तसेच चाकू आढळून आला. रविवारी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने सरफराज शेख या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.

[amazon_link asins=’B0748NPV86,B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c02a1682-b4c9-11e8-8cda-6739a4209aec’]