एका चुटकीत माहिती करून घ्या पैसे डबल होण्याची वेळ; फक्त ‘हा’ फॉर्म्युला वापरा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – बचतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. परंतू वारंवार व्याजदर बदलत असल्याने पैसे किती वेळात डबल होतील, हे शोधणे कठीण आहे. बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणारी प्रत्येक व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करीत असलेले पैसे किती दिवसांत दुप्पट होईल हे जाणून घेण्यास उत्सुक असते.

एखाद्या योजनेत आपले पैसे किती दिवस दुप्पट होतील, याची सहज गणना करायची असेल तर आपल्याला Rule of 72 माहित असणे आवश्यक आहे. यामुळे बँकेच्या फिक्स डिपॉझिट्सोबत अशाच काही बचत योजना, पब्लिक प्रोविडेंट फंड, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, सुकन्या समृद्धी योजना, स्मॉल सेविंग स्कीम आणि सिनियर सिटीजन्स सेविंग स्कीम यांसारख्या योजनेत पैसे दुप्पट होण्याची वेळ जाणून घेतली जाऊ शकते.

असा आहे Rule of 72
बचत योजनेत गुंतवणूक केल्यानंतर जमाकर्त्यांना व्याज मिळते. Rule of 72 हा एक सर्वसाधारण फॉर्म्युला आहे, ज्यामुळे हे सहज कळते की कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक केलेले पैसे किती दिवसात दुप्पट होतील. याची गणना करण्यासाठी तुम्ही कोणत्याही योजनेत मिळालेल्या व्याज दरास ७२ ने भाग द्या. किती दिवसात हा निधी दुप्पट होईल, हे बाहेर येईल.

उदाहरणादाखल समजून घ्या की तुमचे पैसे दुप्पट कधी होतात
समजा तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल आणि PPF सध्या ७.१% व्याज देत असेल, तर ७२ ने भाग दिल्यानंतर रिझल्ट येईल तो असेल १०.१४, म्हणजे १०.१४ वर्षात PPF मध्ये गुंतवणूक केलेले तुमचे पैसे डबल होतील. PPF वर मिळणारा व्याज सरकार प्रत्येक तिमाहीत ठरवत असते. याप्रकारे National Savings Certificate वर आता ६.८% व्याज मिळत आहे, तर ६.८ ने भाग दिल्यावर रिझल्ट येईल १०.५८, म्हणजेच इतक्या वर्षात या योजनेतील तुमचे पैसे डबल होतात. याप्रकारे तुम्ही कोणत्याही योजनेत किती दिवसांत पैसे डबल होतील, हे मोजू शकता.