Bank FD Rules | तुम्ही सुद्धा केली असेल बँकेत FD तर जाणून घ्या महत्वाच्या ‘या’ गोष्टी, अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Bank FD Rules | सर्वप्रकारच्या सेव्हिंग्ज स्कीम्स (Savings Schemes) मध्ये फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) लोकांचा सर्वात पसंतीचा पर्याय असतो. बचत करण्याची ही पद्धत प्रत्येक वयाच्या लोकांना पसंत येते. याचे सर्वात मोठे कारण आहे दुसर्‍या स्कीम्सच्या तुलनेत ही सुरक्षित आणि सर्वात कमी जोखमीची (Bank FD Rules) आहे.

तर होईल चांगला लाभ

छोट्यापासून मोठ्या कालावधीसाठी सुद्धा यामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला एफडीचे संबंधीत नियम, टॅक्ससह अनेक प्रकारची माहिती देणार आहोत, जी लक्षपूर्वक जाणून घेतील तर तुम्ही सहजपणे या सेव्हिंग स्कीमचा चांगला लाभ घेऊ शकता.

दोन प्रकारच्या असतात FD

सामान्यपणे एफडी दोन प्रकारची असते. पहिली क्युमुलेटिव्ह एफडी आणि दुसरी नॉन क्युमुलेटिव्ह एफडी असते. यामध्ये तिमाही आणि वार्षिक आधारावर व्याज मिळते. मात्र, तुम्ही रेग्युलर इंटरव्हलवर सुद्धा व्याजाचा लाभ घेऊ शकता.

Fixed Deposit मध्ये गुंतवणुकीचे हे आहेत फायदे –

फिक्स्ड डिपॉझिट सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.

जमा मुळ रक्कमेवर जोखीम नसते. ठराविक कालावधी रिटर्न मिळतो.

एफडीवर बाजाराच्या चढ-उताराचा थेट परिणाम होत नाही.

मासिक प्रकारे व्याजसुद्धा मिळू शकते.

वरिष्ठ नागरिकांसाठी जास्त रिटर्न मिळतो.

एकदाच गुंतवणूक करावी लागते.

मॅच्युरिटी कालावधीपूर्वी सुद्धा पैसे काढण्याची परवानगी, पण व्याजाचे नुकसान होते आणि पेनल्टी लागते.

 

एफडीवर टॅक्स कपातीचे नियम

फिक्स्ड डिपॉझिटवर 0 ते 30 टक्केपर्यंत टॅक्स कापला जातो. तो गुंतवणुकदाराच्या इन्कम टॅक्स स्लॅपनुसार कापला जातो.

जर तुम्ही एका वर्षात 10 लाखापेक्षा जास्त कमावत असाल तर एफडीवर तुम्हाला 10 टक्के टॅक्स द्यावा लागेल.

मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या पॅनकार्डची कॉपी जमा करावी लागेल.

जर पॅनकार्ड जमा केले नाही तर यावर 20 टक्के टीडीएस कापला जाईल.

जर गुंतवणुकदाराला टॅक्स कपातीपासून बचाव करायचा असेल तर यासाठी त्याने आपल्या बँकेत फॉर्म 15A सबमिट केला पाहिजे.

हे त्या लोकांसाठी लागू होते, जे कोणत्याही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. टॅक्स कपातीपासून वाचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म 15 H जमा केला पाहिजे. (Bank FD Rules)

 

Web Title : Bank FD Rules | bank fd rules if you have fd in bank then know these rules to benefits check here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीपूर्वी ‘विक्रमी’ स्तरापासून 9,500 रूपयांनी ‘स्वस्त’ झाले सोने; जाणून घ्या नवीन दर

Pune BJP | प्रभाग 19 मधील समस्या सोडविण्यासाठी भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि तुषार पाटील नेहमीच अग्रेसर; मनपा निवडणुकीत काँग्रेसला त्यांची जागा दाखवा – जगदीश मुळीक (Video)

MP Supriya Sule | लखीमपूरच्या घटनेवरून खा. सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘घणाघात’, म्हणाल्या… (व्हिडीओ)