
Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Fraud | कोरोना महामारी (Corona epidemic) च्या काळात लोक आपली बँकेशी संबंधीत बहुतांश कामे ऑनलाईनच करत आहेत. अशावेळी सायबर गुन्हेगार सुद्धा याचा फायदा घेत आहेत. लोकांची बँकेशी संबंधीत फसवणूक (bank fraud) होण्याचे प्रकार वेगाने वाढत आहेत. गुन्हेगार लोकांना फसवून काही मिनिटात त्यांचे बँक अकाऊंट (Bank Account) रिकामे करतात. यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करतात. यापैकी एक पद्धत विशिंग आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात. (Bank Fraud)
विशिंग काय आहे
विशिंगमध्ये सायबर गुन्हेगार फोन कॉलद्वारे तुमची गोपनीय माहिती मिळवतात. यामध्ये यूजर आयडी, लॉगईन आणि ट्रांजक्शन पासवर्ड, ओटीपी, यूआरएन, कार्ड पिन, ग्रिड कार्ड व्हॅल्यू, सीव्हीव्ही किंवा इतर खासगी माहिती जसे की जन्म तारीख, आईचे नाव ई. चा समावेश असतो.
सायबर गुन्हेगार बँकेकडून बोलत असल्याचे सांगतात आणि ग्राहकांकडून त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवतात. ही माहिती तुमच्या परवानगीशिवाय वापरून तुमची बँक अकाऊंट संबंधी फसवणूक करण्यासाठी वापरतात. ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होते. (Bank Fraud)
फ्रॉडपासून वाचण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात
1. तुमच्या बँकेला तुमच्या खासगी डिटेल्सची माहिती असते. त्यामुळे अशा कॉलर पासून सावध रहा. ज्यास तुमच्या बेसिक पर्सनल डिटेल्स जसे की, नाव इत्यादी माहिती नसेल. जर तुम्हाला असा कॉल आला तर याची माहिती बँकेला द्या.
2. कोणताही मेसेज, ईमेल किंवा एसएमएसमध्ये दिलेल्या फोन नंबरवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा अकाऊंट डिटेल्स अजिबात देऊ नका. विशेषता त्यांनी तुमचे क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेशी संबंधीत माहिती मागितली तर ती देऊ नका.
3. जेव्हा कुणी टेलिफोन नंबर देतात, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक स्टेटमेंटवर दिलेल्या नंबरवर फोन करून तो व्हेरिफाय केला पाहिजे की, दिला गेलेला नंबर खरोखर बँकेचा आहे किंवा नाही.
4. तुमची वैयक्तिक माहिती किंवा डेबिट कार्डची माहिती विचारण्यासाठी एसएमएस किंवा कॉल आला तर ती माहिती देऊ नका.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update