बँक घोटाळा प्रकरणात CBI चे महाराष्ट्रासह देशात छापे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँक घोटाळा प्रकरणात राज्यासह देशभरामध्ये सीबीआयने छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. PMC बँकेचा घोटाळा ताजा असताना सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. देशभरातल्या विविध बँकांमध्ये 7 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा झाला आहे. यामध्ये अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बँक घोटाळ्यांचा 35 प्रकरणी सीबीआयकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचा तपास करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयाने महाराष्ट्रासह देशभरात 169 ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत सीबीआयला आक्षेपार्ह कागपत्र, महत्त्वांच्या फाईल्स, लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर कागपत्र सापडली आहेत. बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या लोकांनी आपल्या नातेवाईक आणि संबंधीत लोकांना भरमसाठ कर्ज वाटायची आणि नंतर भरायचीच नाहीत असा उद्योग अनेक ठिकाणी सुरु होता. या घोटाळ्यात सामान्य ठेविदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे.


रिझर्व्ह बँकेनेही निर्बंध आणल्याने अनेक बँकांमध्ये लोकांना पैसे काढणे अवघड झाले आहे. अशा घटनांमुळे लोकांचा बँकांवरील विश्वास उडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच बँकांनी आपल्या व्यवहारात सुधारणा करत पारदर्शकता आणावी असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात 8 खातेदारांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलीकडेच आरबीआयने बँकेच्या ग्राहकांसाठी रोख रक्कम काढण्याची कमाल मर्यादा 25,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे. काही विशेष प्रकरणांमध्ये आरबीआयने 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची तरतूद केली आहे.

Visit : Policenama.com