जर तुम्हाला ‘असा’ कॉल आला तर रहा सावधान ! बँक अकाऊंट होईल ‘रिकामं’, सुशिक्षीतांची देखील झालीय ‘फसवणूक’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. आतापर्यंत फक्त ओटीपी आणि पिन नंबर विचारून चोरी केली जात होती आता मात्र चोरट्यांनी असा काही प्लॅन बनवलेला आहे की ज्यानुसार भले भले सुशिक्षित लोक यामध्ये अडकून पडत आहेत. त्यामुळे सावध रहा एक कॉल तुमच्या आयुष्यभराची कमाई घेऊन जाऊ शकतो.

पेटीएम केवायसी करायची आहे त्या बहाण्याने लुटारू आता मोबाइलवर एक लिंक पाठवत आहेत या लिंकवर क्लिक करून एक अँप डाउनलोड करायला सांगत आहेत. हे अँप डाउनलोड होताच तुमच्या पेटीएम खात्यातील सर्व पैसे गायब होत असे. अशा प्रकारच्या ५ तक्रारी मागील दोन दिवसात पोलिसांकडे आलेल्या आहेत.

1) जनता कॉलनी, रोहतक येथील रहिवासी अरुण शर्मा यांनी पोलिसांना सांगितले की 6 डिसेंबर रोजी एका मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ज्याने स्वत: ला पेटीएमचा कर्मचारी म्हणून सांगितले. त्यानंतर ते म्हणाले की आपल्या पेटीएमच्या केवायसीची तारीख कालबाह्य होणार आहे, ज्याची पुन्हा पडताळणी करावी लागेल. आपण आपले केवायसी करू असेही त्यांनी सांगितले.

यासाठी टीम व्यूवर अ‍ॅप इंस्टाल करण्यास सांगितले. अरुण म्हणाले की, हे अ‍ॅप टाकताच त्याच्या खात्यातून 4200 रुपये दुसर्‍या क्रमांकावर ट्रान्सफर करण्याचा मेसेज आला. त्यानंतर त्या चोराने फोन ठेऊन दिला. त्यानंतर अनेकदा त्या नंबरवर फोन करून देखील पुन्हा कॉल लागला नाही. त्यानंतर अरुण यांना 37,400 रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला.

2) अर्बन एस्टेट येथील पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीनुसार डॉ. शिल्पा कावरा यांनी सांगितले की, दुपारी त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीकडून मेसेज आला ज्यामध्ये पेटिएम केवायसी संपलेली आहे पुन्हा रजिस्टर करा असे लिहिण्यात आले होते. यानंतर एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने केवायसीसाठी एका लिंकवर क्लिक करायला सांगितले. त्यावर क्लिक करताच कावरा यांच्या खात्यातील 14 हजार 273 रुपये डेबिट झाले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like