शिक्रापुरात बँकेची 3.28 कोटीची फसवणूक; बँकेला तारण दिलेल्या जमिनीची केली बँकेच्या परस्पर विक्री, वकील व शिक्षिकेसह 5 जणांवर FIR

शिक्रापुर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथील शरद सहकारी बँकेला जमीन तारण देऊन बँकेतून तीन कोटी रुपये कर्ज घेतलेले असताना देखील बँकेचे कर्ज न भरता बँकेला तारण दिलेल्या जमिनीची बँकेच्या परस्पर विक्री केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका माजी मंत्री दर्जा व्यक्ती, वकील व शिक्षिकेसह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, सुरेश काशिनाथ भुजबळ व वेंकट एस. चलसानी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील शरद सहकारी बँकेतून सुरेश भुजबळ यांनी व्यवसाय वाढीसाठी २०१३ साली तीन कोटी रुपये कर्ज घेतले होते, यावेळी कर्ज घेताना जामीनदार शैला भुजबळ, जयश्री धुमाळ, राजेश धुमाळ व वेंकट चलसानी यांच्या नावे असलेल्या वेगवेगळ्या जमीन व इमारत बँकेला तारण म्हणून दिले होते, मात्र त्यांनतर भुजबळ यांनी बँकेचे कर्ज हप्ते भरले नसल्याने सर्वांना बँकेकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र तरी देखील बँकेच्या कर्जाचे पैसे भरले नसल्याने जमिनीवर जप्तीचे आदेश देखील काढण्यात आले यावेळी कर्जदार व जमीनदार यांनी बँकेला वेगवेगळ्या स्वरूपाचे चेक देऊन रक्कम भरणार असल्याचे कबुल केले मात्र सदर रक्कम बँकेला भरली नाही, दरम्यान बँकेचे वकील यांनी बँकेला तारण दिलेल्या जमिनीचे सर्च रिपोर्ट मध्ये बँकेला तारण दिलेल्या जमिनीची २०१४ व २०१५ मध्ये बँकेची परवानगी न घेता बँकेची फसवणूक करत तारण दिलेली जमीन परस्पर इतर व्यक्तींना विक्री केली असल्याचे समोर आले, दरम्यानच्या काळात सुरेश भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करत कर्ज भरणार असल्याचे सांगितले आणि बँकेला कर्जदार व जामीनदार यांच्या नावे दिलेले सर्व चेक बाउंस केले व कर्ज भरलेच नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन बँकेला तारण दिलेली मालमत्ता देखील बँकेच्या परस्पर विक्री करून बँकेची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत शरद सहकारी बँकेचे वसुली विभाग प्रमुख राजाराम मारुती डेरे वय ४५ वर्षे रा. नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शैला सुरेश भुजबळ, जयश्री शिवाजी धुमाळ, राजेश शिवाजी धुमाळ, सुरेश काशिनाथ भुजबळ सर्व रा. तळेगाव रोड शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे तसेच वेंकट एस. चलसानी रा. इंदिरा सोसायटी वडगाव शेरी ता. हवेली जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व प्रताप कांबळे हे करत आहे.