…तर तुम्हाला बँक देणार दिवसाला ‘एवढी’ रक्‍कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपण आजकाल बँकेची कामे ऑनलाईन करतो किंवा बँकेत जाण्याचा कंटाळा करून एटीएम, डिपॉझिट मशीनचा वापर अधिक करतो. पण कधी कधी हे मशीन आपल्याला धोका देऊन जातात. बऱ्याचदा आपण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातो आणि काहीतरी कारणानं पैसे बाहेर येत नाहीत. हे एटीएम ट्रान्झक्शन फेल जातं. पण तुमच्या मोबाईलवर पैसे गेल्याचा मॅसेज येतो. हे पुन्हा मिळवता येतात. मात्र कधी ते लवकर येतात तर कधी हे अधिक वेळे घेते. पण तुम्हाला माहित आहे का की तुमचे पैसे तुम्हाला लवकर मिळाले नाही तर बँकेकडून तुम्हाला दंड वसूल करता येतो.

आरबीआयच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१८ (२०१७-२०१८) मध्ये एटीएमधून पैसे कापले गेले, पण हातात आले नाही, ऑनलाईन मनी ट्रान्सफर फेल गेले, पैसे कापले जातात, अशा पद्धतीच्या जवळपास १६ हजार तक्रारींची नोंद झालीय. त्यावर आरबीआयने नियमावली बनलवली आहे. त्यानुसार बँकेनं रिफंड करण्यात उशीर केला तर तुम्हाला बँकेकडूनही दंड वसूल करण्याचा हक्क आहे.

यात ज्या दिवशी तुम्ही फेल ट्रान्झक्शनची तक्रार दाखल करणार त्यानंतर सात दिवसांत (वर्किंग डे)मध्ये तुम्हाला जर रिफंड मिळाला नाही तर बँक प्रती दिवसासाठी १०० रुपयांच्या हिशोबानं तुम्हाला दंड भरेल, असं या नियमात म्हटलं आहे.

काय आहेत आरबीआयचे नियम-

१) जर तुमचे पैसे हातात न मिळताही तुमच्या अकाऊंटमधून पैसे कापले गेले तर त्याची सर्वप्रथम तक्रार दाखल करा. ज्या बँकेनं तुम्हाला हे कार्ड दिलंय त्या बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क करा.

२) तुम्ही कोणत्या एटीएममधून ट्रान्झक्शन केलंय त्याचा कोणताही फरक पडत नाही

३) फेल ट्रान्झक्शन होऊनही अकाऊंटमधून पैसे कापले गेले तर बँकेला सात दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड द्यावा लागेल

४) तुम्ही तक्रार दाखल केली नसेल तरीदेखील बँक तुम्हाला रिफंड करण्यासाठी बांधिल असेल.

५) तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर ३० दिवसांच्या आत तुम्हाला हे काम करावं लागेल. अनेकदा २४ तासांच्या आत ग्राहकांना रिफंड केला जातो.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

 

Loading...
You might also like