Bank Holiday In Maharashtra And Goa | डिसेंबरमध्ये 13 दिवस बँकांना सुट्टया, जाणून घ्या महाराष्ट्र आणि गोव्यात किती दिवस राहणार बँका बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bank Holiday In Maharashtra And Goa | वर्षाचा शेवटचा महिना येऊ घातला आहे. या सरत्या वर्षात शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी, नाताळ आणि इतर महत्वाचे दिवस आणि 4 रविवार येत आहेत. त्यामुळे बँकांना तब्बल 13 दिवस सुट्टया मिळणार आहेत. (Bank Holiday In Maharashtra And Goa)

बँकांशी संबंधित कामे लवकरात लवकर करुन घेण्याचे आवाहन बँकांनी केले आहे. कारण येत्या महिन्यात देशभरातील सर्व बँका तब्बल 13 दिवस बंद राहणार आहेत. महाराष्ट्रात 6 दिवस आणि गोव्यात 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व बँकेने (Bank Holiday) डिसेंबर महिन्यासाठी बँकिंग सुट्ट्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच चार रविवार आणि इतर सुट्ट्या मिळून 13 दिवस बँकांना टाळे असणार आहे.

बँकांच्या सुट्ट्या विविध राज्यांतील सणांवर अवलंबून असतात. त्यानुसार राज्यात 4, 10, 11, 18, 24, आणि
25 तारखेला बँका बंद राहतील. तर गोव्यात 4, 10, 11, 18, 24 आणि 25 तारखेला तसेच 3 आणि 19 डिसेंबर
रोजी बँका बंद राहतील.

Web Title :-Bank Holiday In Maharashtra And Goa | banks will have 6 holidays in december Maharashtra and in goa 8 holidyas to bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

Milind Gawali :‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Janhvi Kapoor | जान्हवीने धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहर बद्दल केले ‘हे’ मोठे विधान