Bank Holiday In March | मार्च महिन्यात ‘एवढ्या’ दिवस बँक राहणार बंद; पहा संपूर्ण यादी

0
465
Bank Holiday In March | bank holiday in march 2023 banks will be closed total 12 day in next month chech the rbi list here
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : पुढच्या महिन्यात म्हणजेच येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये अनेक सण उत्सव साजरे होणार आहेत. त्यामुळे आरबीआयने पुढील महिन्यासाठीची बँक हॉलिडे (Bank Holiday In March) यादी जाहीर केली आहे. जर आपणास पुढच्या महिन्यात बँकेच्या महत्त्वाच्या काही महत्त्वाची कामे करायची असतील तर ती याच महिन्यात आपण पूर्ण करू शकता. कारण पुढच्या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 12 दिवस बँक बंद राहणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holiday In March) यादी जाहीर करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात होळी हा सण आहे. त्याचबरोबर धुलीवंदन, रंगपंचमी, गुढीपाडवा,तेलगू नववर्ष, रामनवमी ज्या त्या राज्याप्रमाणे सर्व सण उत्सव मार्च महिन्यात पाहायला मिळणार आहेत आणि ज्या त्या राज्या प्रमाणेच रिझर्व बँकेने त्यांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर या सणांव्यतिरिक्त मार्च महिन्यात रविवार आणि दुसऱ्या चौथ्या शनिवारसह असे एकूण सहा साप्ताहिक सुट्याही आहेत. असे असले तरी आपण घरून ऑनलाईन बॅंकेची कामे करू शकणार आहे. (Bank Holiday In March)

मार्च महिन्यात या दिवशी बँक राहतील बंद

तारीख – कारण
03 मार्च – चापचर कूट
05 मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
07 मार्च – होळी/ होलिका दहन/ डोल जात्रा
08 मार्च – धुलेटी/ डोल जात्रा/ होळी/ याओसांग (दुसरा दिवस)
09 मार्च – होळी (पाटणा)
11 मार्च – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
12 मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
19 मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 मार्च – गुढी पाडवा/ उगादी/ बिहार दिवस/प्रथम नवरात्र/ तेलगू नववर्ष
25 मार्च – चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
26 मार्च – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
30 मार्च – राम नवमी

Web Title :- Bank Holiday In March | bank holiday in march 2023 banks will be closed total 12 day in next month chech the rbi list here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akola Crime News | धक्कादायक ! सैन्य दलात असलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला; नंतर स्वतःच सासूला फोन करुन दिली माहिती

Police Committed Suicide in Mumbai | मुंबई पोलीस दलात खळबळ! भायखळा कारागृहाबाहेर तैनात पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Pune Accident News | भरधाव वेगातील कार पलटून भीषण अपघात; 3 ठार तर 1 जखमी